शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

बालेकिल्ल्यातच घड्याळाला घरघर

By admin | Updated: October 19, 2014 22:47 IST

तालुक्यातील नेत्यांनाच एकमेकांत झुंजवत ठेवून स्वत:चे महत्त्व अबाधित राखण्याची राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेतृत्वाची खेळी पुणे जिल्ह्यातच त्यांच्यावर उलटली

पुणे : तालुक्यातील नेत्यांनाच एकमेकांत झुंजवत ठेवून स्वत:चे महत्त्व अबाधित राखण्याची राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेतृत्वाची खेळी पुणे जिल्ह्यातच त्यांच्यावर उलटली. त्यामुळे राज्यात इतरत्र बरी कामगिरी करीत असताना पुण्याच्या बालेकिल्ल्यात मात्र राष्ट्रवादीला जबर धक्का बसला.राष्ट्रवादीच्या गेल्या वेळी जिल्ह्यात ६ जागा होत्या. त्या यंदा अर्ध्याच झाल्या. इंदापूरमधील प्रतिष्ठेची जागा आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळाले असले, तरी जुन्नर, खेड, शिरूर आणि दौंड या जागा राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या. अपेक्षेप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी विजय मिळविला असला, तरी इतरत्र मात्र राष्ट्रवादीला जबर पराभव पत्करावा लागला.विशेष म्हणजे, खेड आणि दौंडमध्ये राष्ट्रवादीच्याच बंडखोरांनी इतर पक्षात प्रवेश करून विजय मिळविला. खेडमध्ये गेल्या वेळी तिकीट देऊनही दिलीप मोहिते यांच्या दबावाखाली ऐन वेळी सुरेश गोरे यांना उमेदवारी नाकारली. मोहिते यांच्या विरोधात तालुक्यातील नेत्यांनीच परिवर्तन आघाडी उघडली होती. त्यातील गोरे शिवसेनेकडून आणि शरद बुट्टे-पाटील हे भाजपाकडून लढून राष्ट्रवादीच्या पराभवाचे कारण ठरले. दौंडमध्ये कुल-थोरात या गटांना एकत्र करण्यात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला अपयश आले. त्यामुळे कुल यांनी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करून विजय मिळविला. शिरूरमध्ये बाबूराव पाचर्णे यांना गेल्या वेळी पक्षात घेऊन ऐन वेळी तिकीट नाकारले. या नाराजीतून गेल्या वेळच्या पराभवाचा वचपा त्यांनी यंदा भाजपाची उमेदवारी घेऊन काढला. जुन्नरमध्ये तर राष्ट्रवादीचे अतुल बेनके तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. येथे मनसेचे शरद सोनवणे यांनी अनपेक्षितपणे बाजी मारली. इंदापूरची जागा प्रतिष्ठेची करून राष्ट्रवादीने हर्षवर्धन पाटील यांना कोंडीत पकडले होते. सर्व ताकद पणाला लावून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. कॉँग्रेसला जिल्ह्यात केवळ भोरमध्ये संग्राम थोपटे यांच्या रूपाने अस्तित्व टिकविता आले आहे. पुरंदरमध्ये राष्ट्रवादीचे तब्बल २९ इच्छुक होते. त्यामुळे एकत्रित प्रचार झालाच नाही आणि अशोक टेकवडे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. कॉँग्रेसचे संजय जगताप यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. मावळमध्ये राष्ट्रवादी प्रथमच एकत्रित लढत होती. भाजपाचे बाळा भेगडे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला.