शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
4
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
5
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
6
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
7
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
8
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
9
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
10
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
11
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
12
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
13
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
14
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
15
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
17
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
18
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
19
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
20
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ

Arogya Bharti| आरोग्य पेपरफुटी प्रकरण: २० जणांना पेपर वितरित करुन कमाविणार होते १ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 13:03 IST

आरोग्य विभागाच्या गट ड चा पेपर फुटला. त्याप्रमाणेच गट क चा पेपर फुटला असल्याचा संशय असल्याचे लोकमतने प्रकाशित केले होते...

पुणे:आरोग्य विभागाचा ड गटाचा पेपर फोडून तो २० जणांपर्यंत पोहचवायचा आणि त्यांच्याकडून १ कोटी रुपये घेऊन ते महेश बोटले आणि प्रशांत बडगिरे यांनी प्रत्येकी ५० लाख रुपये वाटून घेण्याचा कट या दोघांनी रचला होता. मात्र, त्यांनी ज्यांना हा पेपर वितरित केला त्यांनी तो आणखी अनेकांना वितरित केला. त्यातून तो व्हॉटसॲपवर व्हायरल झाल्याने पेपर फुटीचे हे बिंग बाहेर पडल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. सायबर पोलिसांनी सहसंचालक महेश बोटले याला आज न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. डोलारे यांनी त्याला १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे.

सायबर पोलिसांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान चे सहसंचालक महेश बोटले याला बुधवारी रात्री अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात हा पेपर कसा फोडला व त्यातून ते कशी कमाई करणार होते, हे पुढे आले आहे. महेश बोटले हा २४ व ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या गट क व ड पदाचे भरतीचे लेखी परिक्षेचा पेपर समितीचा सदस्य म्हणून पेपर ताब्यात असताना त्याने गट ड च्या पदाचे परिक्षेचा पेपर परिक्षेपूर्वी मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याला दिले होते. त्याबदल्यात परिक्षार्थीकडून बडगिरे याने स्वीकारलेल्या रक्कमेतून अर्धी रक्कम बोटले याच्या वाट्याला येणार होती. महेश बोटले याच्याकडून त्याचा मोबाईल, लॅपटॉप, त्याच्या कार्यालयातील वापरातील संगणकाची हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह व सीसीटीव्ही स्टोअरेजसह डिव्हीआर ई साधने तपासासाठी जप्त करण्यात आली आहे. त्याचा रिओपन करुन पंचनामा करुन डिजिटल पुरावा मिळवायचा आहे. त्याने बडगिरे याच्या व्यतिरिक्त आणखी कोणाला प्रश्नपत्रिका पाठवली

होती का? अटक आरोपींना आणखी कोणी मदत केली? बोटले याने पेपर नेमका कशा पद्धतीने बडगिरे याला पाठवला, तसेच विभागातील पेपर सेट करणार्या समितीतील इतर सदस्य लाभार्थी आहेत का याचा तपास करण्यासाठी बोटले याला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली होती. न्यायालयाने बोटले याला १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

गट 'क' चा पेपर फुटल्याचा तपास करणारआरोग्य विभागाच्या गट ड चा पेपर फुटला. त्याप्रमाणेच गट क चा पेपर फुटला असल्याचा संशय असल्याचे आज लोकमत ने प्रकाशित केले होते. महेश बोटले या गट क व गट ड या पदाचे भरतीचे लेखी परिक्षेचा पेपर समितीचा सदस्य आहे. त्याने गट ड शिवाय इतर गटाचे भरती परिक्षेमध्ये आणखी कोणत्या एजंटांना त्या परिक्षेचे पेपर्स वितरीत केले आहे का याचा तपास करणार आहे. इतर कोणकोणत्या पदाचे भरती परिक्षेकरीता बनविलेला लेखी पेपर सेट करणार्या समितीत समावेश होता. तसेच इतर कोणती जबाबदारी दिलेली होती. त्या जबाबदारी दरम्यान त्याने त्याचा स्वत:चे फायद्याकरीता किती प्रकरणात उपयोग केला याचा तपास करायचा असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी न्यायालयात सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीHealthआरोग्य