शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रणासाठी तब्बल सोळा अधिका-यांची फौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 15:46 IST

जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांचा आदेश

ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्व ऑक्सिजन सिलेंडर रिफीलींग सेंटरवर बारीक लक्ष

पुणे: शहरी भागासह आता ग्रामीण भागात आणि संपूर्ण जिल्ह्यातच कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.  यामुळेच रुग्णांचे हाॅस्पिटलमध्ये दाखल होण्याचे व त्यांना लागणा-या ऑक्सीजन व रेमडेसिविर व अन्य औषधांची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, अनेक हाॅस्पिटला तीन-चार दिवस ऑक्सीजन पुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनची  निर्मिती पुरेशा प्रमाणात होत असली तरी ऑक्सिजन सिलेंडर रिफीलींग सेंटरवर उशीर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळेच जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी स्वतंत्र आदेश काढून ऑक्सिजन सिलेंडर रिफीलींग सेंटरवर लक्ष ठेऊन ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तब्बल १६  वरिष्ठ अधिका-यांची फौज नियुक्त केली आहे. 

जिल्हाधिकारी देशमुख यांनी आपल्या आदेशात पुणे जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागात मोठया प्रमाणात कोरोना (कोविड १९) विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊन रुग्ण संख्येमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे पुणे जिल्हयातील कोव्हिड रुग्णांवर उपचार करणेसाठी मोठ्याप्रमाणात कोविड केअर सेंटर, कोविड हाॅस्पिटल, जम्बो कोविड हाॅस्पिटलसह खाजगी हाॅस्पिटल कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सिलेंडर्स त्याचप्रमाणे सक्षम  यंत्रणा व पाईपलाईन करण्यात आलेली आहे. कोविड रुग्णांवर वैद्यकीय उपचारा दरम्यान ऑक्सिजन उपलब्ध करुन देणे अत्यंत आवश्यक आहे.

जिल्ह्यात ऑक्सिजनची निर्मिती पुरेशा प्रमाणात होत असली तरी केवळ ऑक्सिजन सिलेंडर रिफीलींग सेंटरवर उशीर होत असल्याने हाॅस्पिटलला वेळेवर ऑक्सीजन पुरवठा होत नसल्याचे समोर आले. याच साठी जिल्ह्यातील ऑक्सिजन सिलेंडर रिफीलींग पुरवठा करणा-या १६  वितरकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १६ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळेच शहर आणि जिल्ह्यातील ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार