लष्करात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारा परदेशी अटकेत
By नितीश गोवंडे | Updated: March 10, 2024 17:29 IST2024-03-10T17:29:16+5:302024-03-10T17:29:48+5:30
कोंढवा भागातील एका दुकानात चेहरा झाकून खरेदीसाठी आलेल्या परदेशीला पोलिसांनी सापळा लावून पकडले

लष्करात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारा परदेशी अटकेत
पुणे : लष्करात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक करून नेपाळला पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला कोंढवा पोलिसांनीअटक केली. गणेश बाबुलाल परदेशी (रा. कृष्ण केवला सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
परदेशी याने लष्करात नोकरीच्या आमिषाने आठ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. परदेशीने त्याचे राहण्याचे ठिकाण बदलले होते. ओळख लपवण्यासाठी तो चेहरा कापडाने झाकायचा. तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, विकास मरगळे आणि शशांक खाडे यांना मिळाली.
कोंढवा भागातील एका दुकानात चेहरा झाकून खरेदीसाठी आलेल्या परदेशीला पोलिसांनी सापळा लावून पकडले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, उपनिरीक्षक वैभव सोनवणे, अमोल हिरवे, राहुल वंजारी, अभिजीत रन्तपारखी, शशांक खाडे यांनी ही कारवाई केली.