पुण्यात धानोरीच्या सोसायटीत शस्त्र घेऊन घुसले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, सीसीटीव्ही फुटेज समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 16:33 IST2025-04-14T16:32:22+5:302025-04-14T16:33:54+5:30
काळ्या कपड्यांमध्ये, कोयत्यासारखी शस्त्रे हातात घेऊन, सोसायटीच्या आवारात संशयास्पद हालचाली सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसून आल्या आहेत

पुण्यात धानोरीच्या सोसायटीत शस्त्र घेऊन घुसले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, सीसीटीव्ही फुटेज समोर
किरण शिंदे
पुणे : पुण्यातील धानोरी भागात असलेल्या सिद्रा गार्डन सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये ८ एप्रिलच्या पहाटे तीन सशस्त्र आणि मुखवटे घातलेल्या व्यक्तींनी घुसखोरी करून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. या व्यक्तींनी काळ्या कपड्यांमध्ये, कोयत्यासारखी शस्त्रे हातात घेऊन, सोसायटीच्या आवारात संशयास्पद हालचाली केल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची ही हालचाल स्पष्टपणे दिसून आली आहे.
या घटनेनंतर, रहिवाशांचे व सोसायटीचे वतीने यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आणि पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. सकाळी ४ ते ५ च्या दरम्यान, तीन अज्ञात सशस्त्र व्यक्तींनी आमच्या इमारतीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यांनी एका फ्लॅटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली अशी तक्रार करण्यात आली आहे.
पुण्यात धानोरीच्या सोसायटीत शस्त्र घेऊन घुसले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, सीसीटीव्ही फुटेज समोर#pune#dhanori#police#Crime#CCTVpic.twitter.com/OrcQAS3PKi
— Lokmat (@lokmat) April 14, 2025
पुण्यात सोसायटीत अशाच प्रकारे कोयते घेऊन काही तरुणांनी दहशत निर्माण केली होती. तसेच वस्तीत दारावर कोयते मारून नागरिकात भीती पसरवली होती. आता पुन्हा धानोरीत सशस्त्र आणि मुखवटे घातलेल्या तीन व्यक्तींनी दहशत पसरवली आहे. नागरिकांमध्ये या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोसायट्यांमध्ये घुसखोरी वाढत चालल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.