शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून घरावर सशस्त्र हल्ला

By admin | Updated: August 18, 2014 05:15 IST

दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष दादासाहेब शितोळे यांच्या कुसेगाव (ता. दौंड) येथील राहत्या घरावर सशस्त्र हल्ला करून चौघांना जखमी करण्यात आले

पाटस : दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष दादासाहेब शितोळे यांच्या कुसेगाव (ता. दौंड) येथील राहत्या घरावर सशस्त्र हल्ला करून चौघांना जखमी करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एन. एम. सारंगकर यांनी दिली.दादासाहेब शितोळे (वय ६0), अनिल शितोळे (वय ४५), अशोक शितोळे (वय ४0), मनीषा शितोळे (वय ३५ सर्व राहणार कुसेगाव, वागदरमळा) हे चौघे जखमी झाले आहे. याप्रकरणी १0 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार शितोळे, श्रीकांत शितोळे, नीलेश शितोळे, किरण शितोळे, महेश शितोळे, मच्छिंद्र शितोळे, सागर शितोळे, दिगंबर शितोळे, विशाल शितोळे (सर्व राहणार कुसेगाव, ता. दौंड), सोन्या (पूर्ण नाव समजले नाही. रा. देऊळगावगाडा, ता. दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्रवार (दि. १५) रोजी रात्री ११ वाजता आरोपींनी रस्त्यात मोटरसायकल आडवी लावली होती. या किरकोळ कारणावरून दोन्ही कुटुंबांतील व्यक्तींचा वाद झाला होता. त्यानंतर रात्री १ वाजता शितोळे यांच्या घराचा दरवाजा मच्छिंद्र याने वाजवला. या वेळी दादासाहेब शितोळे यांनी दरवाजा उघडला. तेव्हा मच्छिंद्रने त्यांच्या कानावर काठीचा फटका मारल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर अन्य बाकी मंडळी घरात घुसले आणि त्यांनी अनिल याच्या डाव्या पायावर कोयता मारला आणि डोक्यात काठी टाकली. या वेळी जखमीच्या मदतीला त्यांचा भाऊ अशोक आणि भावजयी मनीषा सोडवायला गेले असता अशोक यांच्या मानेवर लोखंडी पाइप मारला, तर मनीषा यांच्या हातावर काठी मारली. हा सर्व प्रकार सुरू असताना जोराचा आरडाओरडा झाला तेव्हा परिसरातील ग्रामस्थ मदतीला धावून आले; मात्र आरोपी पळून गेले होते. घटनेचे वृत्त पोलिसांना कळताच या वेळी पोलीस निरीक्षक एन. एम. सारंगकर, फौजदार एस. एम. जाधव, सुनील वाणी, केशव जगताप, मारुती सुळ, रोकडे अप्पा घटनास्थळी गेले आणि परिस्थितीची पाहणी करून आरोपींचा शोध घेतला; मात्र आरोपी फरार झाले होते. (वार्ताहर)