जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

By नितीश गोवंडे | Updated: February 26, 2024 16:36 IST2024-02-26T16:36:38+5:302024-02-26T16:36:59+5:30

पत्नीने पतीकडे ५०० रुपयांची मागणी केल्यावर पतीने नकार दिला असता त्यांच्यात वाद झाला

Arguments while growing meals Woman stabbing husband incident in Bhawani Pethe | जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जया रमेश ससाणे (३४, रा. पत्र्याची चाळ, जयभीम मित्र मंडळाजवळ, भवानी पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत रमेश बबन ससाणे (४३) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी रमेश ससाणे कामावरून घरी जेवण करण्यासाठी आले. त्यावेळी पत्नी जयाने त्यांच्याकडे ५०० रुपये मागितले. पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर तिने जेवण वाढताना ताट आणि तांब्या आपटला. त्यामुळे रमेश यांनी पत्नीला चापट मारली. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यातून जयाने पती रमेश यांचा दंड आणि पाठीवर चाकूने वार केले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार भाेसले करत आहेत.

Web Title: Arguments while growing meals Woman stabbing husband incident in Bhawani Pethe