पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 00:06 IST2025-08-13T23:56:05+5:302025-08-14T00:06:00+5:30
पुण्यात एका ट्राफिक पोलिसाने एका वान चालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
पुणे : पुण्यात आज एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वाहतूक पोलिस एका कॅबचालकाचा वाद झाल्याचा या दिसत आहे. ट्रॅफिक पोलिसाने आपल्या कारला कट मारून गेल्याच्या रागातून कॅब चालकाने त्यांना जाब विचारत शिवीगाळ केली. यानंतर संतप्त झालेल्या ट्रॅफिक पोलिसाने या कॅब चालकाला मारहाण केली. या कॅब चालकाने ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आज सकाळी पुणे रेल्वे स्टेशनसमोर एका कॅब चालकाचा किरकोळ अपघात झाला. अपघातानंतर कॅब चालक रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून उभा होता. त्याचवेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याची गाडी थांबवून, “तू ट्रॅफिक अडवत आहेस आणि लोकांना त्रास देत आहेस” असे सांगितले. या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद वाढला आणि शाब्दिक चकमक झाली. कॅब चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्यावर, त्या कर्मचाऱ्याने देखील कॅब चालकाला मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसते. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, एखाद्याने केलेला या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.