शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु; २ ऑगस्टपर्यंत असणार मुदत  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 7:32 PM

राज्य मंडळातर्फे अकरावी सीईटीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून सीईटीसाठी २० जुलैपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव २१ जुलैपासून संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अकरावी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवारी दुपारी ३ वाजल्यापासून पुन्हा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना येत्या २ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. मात्र, सीईटी अर्जासाठी संकेतस्थळ बदलण्यात आले आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे कळवले.

राज्य मंडळातर्फे अकरावी सीईटीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून सीईटीसाठी २० जुलैपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव २१ जुलैपासून संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले. आता राज्य मंडळाने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी २६ जुलैपासून https://cet.11thadmission.org.in या संकेतस्थळावरून अर्ज भरण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच मंडळाच्या संकेतस्थळावरही सीईटी पोर्टल अ‍ॅक्सेस करण्याची सुविधा दिली आहे.

संगणक प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी ई- मेल आयडी , पूर्वीचा मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे किंवा नव्याने नोंदवणे अनिवार्य आहे.विद्यार्थ्यांना कोणत्या माध्यमातून परीक्षा द्यावयाची आहे, याबाबत विकल्प निवडावा लागेल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या तात्पुरत्या/ कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका / शहराचा विभाग निश्चित करावा लागेल. -------------ज्या विद्यार्थ्यांनी २० जुलै ते  २१जुलै या कालावधीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केलेले आहेत.त्यांना आपल्या अर्जाचा तपशील पूर्वीचा अर्ज क्रमांक व अर्ज भरताना नोंदवलेला मोबाईल क्रमांक टाकून नवीन संकेतस्थळावरून पाहता येईल.या प्रक्रियेत परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.मात्र,प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांचा अर्जाचा तपशील संकेत स्थळावर नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करावा,असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.-------------------------------राज्य मंडळाची २०२१ पूर्वी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई ,आयसीएसई व अन्य मंडळाचे विद्यार्थी यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार आहे.या विद्यार्थ्यांना येत्या बुधवारपासून (दि.२८) पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे,अशी मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी