शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलबसवर आता नजर ठेवणार ‘अ‍ॅप’

By admin | Updated: September 6, 2015 03:34 IST

आपल्या मुलांची स्कूलबस नेमकी कोणत्या ठिकाणी आहे, हे शोधणे आता पालकांना सहज शक्य होणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने विकसित केलेल्या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून

पुणे : आपल्या मुलांची स्कूलबस नेमकी कोणत्या ठिकाणी आहे, हे शोधणे आता पालकांना सहज शक्य होणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने विकसित केलेल्या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पालकांना ही माहिती घरबसल्या मिळणार आहे. स्कूलबसवरील चालक व वाहकावरही लक्ष ठेवता येणार आहे. केंद्र सरकारच्या मोटार वाहन कायद्यांतर्गत स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार मुलांची सुरक्षितपणे ने-आण करणे, त्यासाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करणे आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे या बाबींवर लक्ष केंद्रित करून पुणे आरटीओने मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. स्कूल बससाठी पहिल्यांदाच असे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे स्कूलबसवर नियंत्रण ठेवता येणार आहे. तसेच पालकांना स्कूल बस सुरक्षितता समितीशी संपर्क ठेवणे, बसचा नोंदणी क्रमांक, चालकाचा मोबाईल क्रमांक, बस सुरक्षितता समिती सदस्यांचे मोबाईल क्रमांक, बस वाहतूक मार्ग अशी विविध माहिती या अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे आरटीओ जितेंद्र पाटील यांनी सांगितले.अ‍ॅपद्वारे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनाही स्कूलबस वाहतूक समितीच्या कामकाजाची माहिती ठेवता येणार आहे. वाहनचालकांच्या परवाना वैधतेबाबत आणि बस चालकाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारींबाबत परिवहन विभागासोबतच शाळा व्यवस्थापनास लक्ष ठेवता येईल. तसेच परिवहन अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुस्थितीत असलेल्या स्कूलबसचा अहवाल व स्कूलबसचे मार्गक्रमण या अ‍ॅपद्वारे प्राप्त करता येणार आहे. अ‍ॅपमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे, असे पालकांना वाटल्यास त्याबाबत सूचना करण्याची सोयही अ‍ॅपमध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. २५०० शाळांची अ‍ॅपसाठी नोंदणीअ‍ॅपमध्ये शाळांची, शाळेच्या स्कूलबसची, वाहनचालक व वाहकाची, वाहनांची माहिती भरण्याची, ती अद्ययावत करण्याची सोय करण्यात आली आहे. शहरातील जवळपास ४४०० शाळांपैकी सुमारे २५०० शाळांनी अ‍ॅपसाठी आवश्यक नोंदणी परिवहन विभागाकडे केली आहे. उर्वरित शाळांची माहिती भरण्याचे काम सध्या सुरू आहे.मोबाईल अ‍ॅपचे नाव : स्कूलबस सेफ्टी पुणे माहिती अद्ययावत करण्यासाठी संकेतस्थळ : http://schoolbussafetypune.org