बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 22:07 IST2025-07-04T22:06:31+5:302025-07-04T22:07:29+5:30

एकीकडे शहरात अति महत्वाच्या व्यक्तींचा दौरा असताना, पोलिस आयुक्तांनी काही अधिकार्यांना याच गुन्ह्यांच्या छडा लावण्यासाठी कामाला लावले होते

Any anesthetic spray was used Shocking revelation in Kondhwa case | बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

पुणे : कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात तरुणीवर बेशुद्ध करण्याचा स्प्रे मारून अत्याचार केल्याचे तिने सांगितले होते. मात्र आता पोलीस तपासात या घटनेमध्ये बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नसल्याचे देखील समोर आले आहे. तसेच आरोपी कुरिअर बॉय नसून पीडित तरुणीचा मित्रच असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. आता या प्रकरणातून अनेक धक्कादायक बाबी उघड होऊ लागल्या आहेत.  

मात्र, तरुणाने आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या म्हणण्यावर ती ठाम असल्याने, पोलिस लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे तरुणीने बोलवल्यानंतरच आपण तिच्या घरी गेल्याचा दावा या तरुणाने केला आहे. संगणक अभियंता तरुणीवर कुरिअर बॉयने बलात्कार केल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. 

अन् पोलिस यंत्रणा लागली कामाला..

तरुणीने मध्यरात्री पोलिस ठाण्यात येत दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. मंगळवारी (दि. २) मध्यरात्री अपर पोलिस आयुक्त, उपायुक्त पोलिस ठाण्यात आले. गुन्हे शाखेचे २०० आणि परिमंडळ ५ चे ३०० पोलिस दिवस-रात्र कामाला लागले. एकीकडे शहरात अति महत्वाच्या व्यक्तींचा दौरा असताना, पोलिस आयुक्तांनी काही अधिकार्यांना याच गुन्ह्यांच्या छडा लावण्यासाठी कामाला लावले होते. एवढेच नाही तर स्वतः पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन दिवस कोंढवा पोलिस ठाण्याला भेट देऊन संपूर्ण तपासाची माहिती घेतली.

सोसायटीतील ४४ सदनिका धारकांचे जबाब नोंदवले..

पोलिसांनी तरुणी राहत असलेल्या सोसायटीमधील सर्व रहिवाशांना तरुणाचा फोटो दाखवला. अशा प्रकारची व्यक्ती आपल्या कोणाच्या घरी त्या दिवशी आली होती का? अशी विचारणा केली. त्यावेळी ४४ सदनिका असलेल्या सोसायटीतील लोकांनी ही व्यक्ती आपल्या कोणाच्या घरी आली नसल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तरुणीच्या घरी हाच तरुण आल्याचे शिक्कामोर्तब केले. गुरूवारी रात्रभर सदनिका धारकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले.

पोलिसांनी नजरेनं तिचे खोटं बोलणं हेरलं 

गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मुळीक आणि त्यांच्या पथकाने तरुणीच्या घरी आलेल्या तरुणाचा छडा लावला. त्याचा फोटो शोधून काढला. वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशनासाठी तरुणीला ससून रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी देखील तेथे उपस्थित होत्या. तरुणीला तरुणाचा फोटो ज्यावेळी पोलिसांनी दाखवला त्यावेळी तिने दीड मिनिटे पॉझ घेतला. तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला असा सवाल तीने पोलिसांना केला. त्यानंतर हा तो व्यक्ती नाही असे तिने सांगितले. त्याचवेळी एसीपी मुळीक यांच्या नजरेनं तिचे खोटं बोलणं हेरलं होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दिली.

Web Title: Any anesthetic spray was used Shocking revelation in Kondhwa case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.