शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत भाजीविक्रेत्यांची अँटिजन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:14 IST

१०० चाचण्यांमध्ये एकही संक्रमीत रूग्ण नाही बारामती : शहरात पुन्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासन अ‍ॅक्शनमोडवर ...

१०० चाचण्यांमध्ये

एकही संक्रमीत रूग्ण नाही

बारामती : शहरात पुन्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासन अ‍ॅक्शनमोडवर आले आहे. मंगळवारी (दि.१५) शहरातील सर्वात मोठ्या श्री गणेश भाजी मंडई येथील सर्व भाजीविक्रेते व फळविक्रेत्यांच्या अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. यावेळी १०० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. सर्व अहवाल निगेटिव्ह आले. मंडईमध्ये अनेक ठिकाणी येथील व्यापारी व ग्राहक तोंडाला मास्क न लावता खरेदी व विक्री करत असल्याने नागरिकांचा हलगर्जीपणा कायम असल्याचे चित्र आहे.

बारामती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या श्री गणेश भाजी मंडई हे गर्दीचे ठिकाण असून शहर व तालुक्यातील लोक येथे भाजी खरेदी व विक्रीसाठी येत असल्याने बारामती नगर परिषद अतिक्रमण विभाग व पंचायत समिती आरोग्य विभागाने संयुक्तपणे अँटिजन तपासणी करण्यात आल्या. यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. केलेल्या सर्व तापसण्यांमध्ये एकही कोरोना बाधित आढळून आला नाही. मात्र, एकीकडे प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे मार्गदर्शक सूचनांना अनेक व्यापारी, विक्रेते, ग्राहक हरताळ फासताना दिसत आहेत. शहरामध्ये प्रशासनाकडून विना मास्क सापडल्यास दंडात्मक कारवाई केली जाते तरी देखील नागरिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. बारामती शहरात प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन तपासणी करत आहे.

-----------------------

फोटो ओळी : बारामती येथील भाजीविक्रेत्यांची अँटिजन तपासणी करताना नगर परिषदेचे कर्मचारी.

१५०६२०२१-बारामती-०७