बारामती एमआयडीसीत पुन्हा शिकाऊ विमान कोसळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 10:18 IST2023-10-22T10:17:47+5:302023-10-22T10:18:25+5:30

तीन दिवसात दुसरा विमान अपघात                     

Another training plane crashed in Baramati MIDC | बारामती एमआयडीसीत पुन्हा शिकाऊ विमान कोसळले 

बारामती एमआयडीसीत पुन्हा शिकाऊ विमान कोसळले 

बारामती (प्रतिनिधी) - बारामती तालुक्यातील कटफळ  येथे गुरुवारी (दि  १९ )शिकाऊ  विमान पडल्याची घटना ताजी असतानाच  रवीवारी (दि २२)सकाळी ७ च्या सुमारास दुसरा अपघात घडला.रस्त्यावरील अपघाताप्रमाणेविमान अपघात असल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे. 

बारामतीतील कटफळ परिसरात विमान चालविण्याचे प्रशिक्षण देणारी रेडबर्ड नावाची संस्था आहे.याच संस्थेच्या विमानाचा हा गेल्या दोन दिवसात झालेला हा  दुसरा अपघात आहे. आज सकाळी एमआयडीसी तील जुन्या सह्याद्री काऊ फार्म जवळील लोखंडे वस्तीजवळ हा अपघात झाला. जखमींबाबत सध्या माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

Web Title: Another training plane crashed in Baramati MIDC