वैष्णवी हगवणे ताजे असताना आणखी एक घटना; हुंडा न दिल्याने सासरी छळ, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 15:56 IST2025-05-22T15:54:01+5:302025-05-22T15:56:20+5:30

लग्नात सोने देऊनही भांडी, फ्रीज दिले नाहीत, यासह मानपान केला नाही म्हणून सासरी विवाहितेचा छळ सुरु होता

Another incident while Vaishnavi hagwane kidnapping is fresh In laws harass her for not giving dowry, married woman takes extreme step | वैष्णवी हगवणे ताजे असताना आणखी एक घटना; हुंडा न दिल्याने सासरी छळ, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

वैष्णवी हगवणे ताजे असताना आणखी एक घटना; हुंडा न दिल्याने सासरी छळ, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

किरण शिंदे 

पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरण ताजेअसतानाच पुण्यातील हडपसर मधील घटना समोर आली आहे. मनासारखा हुंडा, मानपान न दिल्याच्या कारणावरुन सुनेचा सासरच्या लोकांकडून छळ करण्यात आला. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. देवकी प्रसाद पुजारी (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती प्रसाद चंद्रकांत पुजारी,  दीर प्रसन्ना चंद्रकांत पुजारी, सासु सुरेखा चंद्रकांत पुजारी व सासरे चंद्रकांत पुजारी यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दीपाचे वडिल गुरुसंगप्पा म्यागेरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल रोजी विजयपूर येथील बागेवाडीतील बसव मंगल कार्यालयात दीपा व प्रसाद यांचा विवाह झाला. लग्न सोहळ्यात दीपाच्या घरच्यांनी हुंडा म्हणून प्रसादला चार तोळे सोने दिले यासह मानपानप्रमाणे १० लाख रुपये खर्च करुन लग्न करुन दिले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी दीपा पुण्यात आली. त्याच दिवसापासून प्रसाद व त्याची आई सुरेखाने लग्नात भांडी, फ्रीज दिले नाहीत. यासह मानपान केला नाही म्हणून वाद घालून तिला शिवीगाळ केली. दीपाने तिच्या वडिलांना ही हकीगत सांगून माहेर गाठलं. परंतु त्यानंतर दीपाच्या सासऱ्याने तिची समजूत घातली आणि तिला पुन्हा पुण्यात आणलं. १८ मे रोजी दीपाने वडिलांना फोन केला व ती रडू लागली आणि लग्नात भांडी सामान दिले नाही. म्हणून प्रसाद, दीर, सासु, सासरे शिवीगाळ करुन मारहाण करत असल्याचे सांगितले. दिपाच्या वडिलांनी मी पुण्यात येतो व वाद सोडवितो असे सांगून तिची तात्पुरती समजूत काढली. पण १९ मे रोजी दीपा हिने हडपसर मध्ये वास्तव्यास असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल असून हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Another incident while Vaishnavi hagwane kidnapping is fresh In laws harass her for not giving dowry, married woman takes extreme step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.