शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा आणखी एक सुभेदार भाजपच्या गळाला..! संग्राम थोपटे प्रवेश करणार;आमदार राहुल कुल यांची मध्यस्थी

By राजू इनामदार | Updated: April 17, 2025 18:33 IST

थोपटे भोर वेल्हे मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला

पुणे: नव्या प्रदेशाध्यक्षांकडून पक्षाची नव्याने संघटनात्मक बांधणी सुरू असताना काँग्रेसला जिल्ह्यात आणखी एक धक्का बसला. भोर विधानसभेचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. थोपटे याविषयी स्पष्टपणे काही बोलले नाहीत, मात्र कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात येत्या काही दिवसातच ते याची घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. त्यांचे मित्र असलेले दौंडचे भाजपचे आमदार राहुल कूल यांनी यासाठी मध्यस्थी केली असल्याचे बोलले जात आहे.थोपटे यांनी ‘लोकमत’ बरोबर बोलताना सांगितले की आमचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा एक मेळावा होता. तो झाल्यानंतरच मला याविषयी समजले. माझ्याकडून मी याचे एकदोन दिवसात स्पष्टीकरण देईल. प्रवेश करणार की नाही याविषयी स्पष्टपणे बोलण्याचे थोपटे यांनी टाळले. काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातून थोपटे यांच्या प्रवेशाला दुजोरा देण्यात आला. ‘त्यांचा निर्णय झाला आहे, मात्र ते प्रवेश करत नाहीत तोपर्यंत आमचेच आहेत’ असे प्रदेश कार्यालयातील एका जबाबदार नेत्याने सांगितले.थोपटे भोर वेल्हे मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांचे वडिल अनंतराव थोपटे हेही त्याच मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. संपूर्ण घराण्याला काँग्रेसची पार्श्वभूमी असतानाही थोपटे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याबद्दल राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दौंडचे आमदार राहूल कूल यांनी त्यांचे मन वळवल्याचे सांगण्यात येते. कार्यकर्त्यांनीही भाजपत प्रवेश करण्याबाबत सकारात्मकता दाखवल्यामुळेच थोपटे यांनी तसा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली.महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात थोपटे यांचे नाव वारंवार विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी घेतले जात होते. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले होते, मात्र आघाडीतील अन्य पक्षांचे एकमत होत नसल्याने थोपटे यांना त्या पदाने हुलकावणी दिली व अडीच वर्षानंतर आघाडीची सत्ताही गेली. त्यानंतरच्या निवडणूकीत थोपटे यांचा पराभव झाला. पक्षापासून ते तेव्हापासून बाजूलाच झाले होते. त्यांचा भाजप प्रवेश नक्की झाला असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाcongressकाँग्रेस