फसवणूक प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींसह मुलाविरुद्ध आणखी एक गुन्हा

By नम्रता फडणीस | Published: January 29, 2024 06:07 PM2024-01-29T18:07:37+5:302024-01-29T18:08:58+5:30

विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला....

Another case against former BJP corporator Uday Joshi along with son in fraud case | फसवणूक प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींसह मुलाविरुद्ध आणखी एक गुन्हा

फसवणूक प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींसह मुलाविरुद्ध आणखी एक गुन्हा

पुणे : जामीनदाराची बनावट स्वाक्षरी करून ७७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी, त्यांचा मुलगा आणि पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी उदय त्र्यंबक जोशी (वय ६५), त्यांचा मुलगा मयूरेश (वय ४६, दोघे रा. पानमळा, सिंहगड रस्ता), निनाद नागरी पतसंस्थेचे कोषाध्यक्ष रामलिंग शिवगणे आणि सचिव अशोक कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तानाजी दिनकर मोरे (वय ४२, रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. उदय जोशी आणि त्यांचा मुलगा मयूरेश यांची गॅस एजन्सी आहे. गॅस एजन्सीत पैसे गुंतविल्यास चांगला परतावा देण्यच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वी जोशी यांच्यासह मुलाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे

दाखल झाले होते. मयुरेशने सदाशिव पेठेतील निनाद नागरी पतसंस्थेतून कर्ज घेतले होते. तक्रारदार ताानाजी मोरे यांना कर्जप्रकरणाची कोणतीही माहिती न देता कर्जप्रकरणावर त्यांची बनावट स्वाक्षरी केली. पतसंस्थेतील पदाधिकारी उदय जाेशी, रामलिंग शिवगणे, अशोक कुलकर्णी, तसेच संचालक मंडळातील अन्य संचालकांशी संगनमत करून ७७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. कर्जप्रकरणाची माहिती मोरे यांना न देता फसवणूक केली, तसेच कर्जाची परतफेड केली नाही.

Web Title: Another case against former BJP corporator Uday Joshi along with son in fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.