शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

...आणि ‘तो’ चोर जाळ्यात सापडला

By admin | Updated: February 12, 2015 23:49 IST

आलिशान गाड्यांच्या काचा फोडून रोख रक्कम व मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळीतील एकाला गुरूवारी येथे नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

यवत : आलिशान गाड्यांच्या काचा फोडून रोख रक्कम व मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळीतील एकाला गुरूवारी येथे नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. येथील बँकेसमोर मोटाराची काच फोडून ५० हजारांची रक्कम काढून पळ काढत असताना युवकांनी एकाला पकडले. मात्र त्याच्या टोळीतील इतरजण रक्कम घेऊन त्यांच्या दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्या चोराला पकडण्यात वरवंड मधील युवक संजय जाधव यांनी लढविलेली शक्कल कामी आली. पंधरा दिवसांपूर्वी जाधव हे हडपसर येथे गेले असताना त्यांच्या गाडीची काच फोडून रोख १५ हजार व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग चोरून नेली होती. त्यानंतर त्यांच्या गाडीचा पाठलाग दुचाकीवरील काही इसम करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे चोरांना पकडण्यासाठी शक्कल लढ़विली. गाडीत बॅग ठेऊन ते यवत येथील बँकेसमोर आले. यांची माहिती या आधी त्यांनी गावातील युवकांना दिली होती. त्यानुसार चोरांना पकडण्यासाठी युवक तयारीत होते. जाधव बँकेत गेल्यानंतर संशयीत तेथे दबा धलन होते. दरम्यान दुसरी एक आलीशान गाडी तेथे आली. संशयितांपैकी एकाने त्या गाडीची पुढील काच फोडून आतील ५० हजाांची रोख रक्कम घेऊन पळ काढला. मात्र आधीच तेथे थांबलेल्या विजय जाधव , विलास पवार, सचिन दिवेकर, चंद्रकांत सातपुते, संतोष दिवेकर यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यातील एकाला पकडण्यात त्यांना यश आले. इतर चोरटे मात्र त्यांच्या दुचाकी वरुण पळाले. चोरट्याच्या दुचाकीची नागरिकांनी यावेळी तोडफोड केली तर चोरालाही चांगलाच चोप दिला. (वार्ताहर)