शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात! आयटी इंजिनिअरला पुण्यातून उचलले; मुळचा साताऱ्याचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 12:49 IST

२०१९ पासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे...

पुणे :पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असलेल्या आयटी इंजिनिअरला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या इंजिनिअरचे नाव अभिजित जांभुरे असून तो मुळचा साताऱ्याचा आहे. तो हिंजवडी येथे आयटी कंपनीत काम करतोय. अभिजितला ओडिशा पोलिसांनी अटक केली आहे. तो २०१९ पासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियामधून अभिजितकडून ओटीपी विक्री आणि शेअर केले जात होते. पुण्यातील आयटी हब हिंजवडी परिसरातील एका कंपनीत तो काम करत होता. चार वर्षांपासून तो पाकिस्तानातील हेरांच्या संपर्कात होता. त्यांना तो पैशांच्या बदल्यात ओटीपीची विक्री करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. ओडिशा पोलीस गेल्या काही महिन्यांपासून याप्रकरणी तपास करत होते. याअगोदर काहीजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनच अभिजितची माहिती मिळाली होती. अभिजित हा मुळचा सातारचा आहे. त्याने गुजरातमधून पदवीचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने हिंजवडीत नोकरी सुरू केली होती. ओडिशा पोलिस आरोपी अभिजितला ओडिशाला घेऊन गेले आहेत.

जांबुरे गेल्या अनेक वर्षांपासून सतत पाकिस्तानी गुप्तचर आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. २०१८ मध्ये तो फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी नागरिक सय्यद दानिश अली नाकवीच्या संपर्कात आला. नाकवी हा फैजलाबादचा रहिवासी असून, त्याने स्वत:ची ओळख चेगमध्ये अमेरिकन एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीत काम करणारा फ्रीलान्सर म्हणून केली होती. जांबुरेने त्याचा युजर आयडी आणि चेगचा पासवर्ड दानिशला नाकवी दिला.दानिशने काही लोकांना जांबुरे याच्या वतीने एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीसाठी काम करायला लावले. ओडिशा आणि देशाच्या इतर भागांतील सायबर चोरट्यांकडून ओटीपी, खासगी माहिती आणि बँक खाती खरेदी केलो. त्याच्या बदल्यात कामाचे पैसे जांबुरे यांच्या भारतातील बँक खात्यात जमा झाले. आणि  जांबुरेने पाकिस्तानसाठी काम करणार्‍या एजंट्सना पैसे दिले. असे एसटीएफच्या अधिकाऱ्याने सांगितले.

दानिशने नंतर जांबुरेची ओळख त्याचा मित्र अब्दुल हमीद उर्फ खुर्रमशी केली करून दिली जो कराचीचा रहिवासी आहे. खुर्रम हा पाकिस्तानी लष्कराचा एक वरिष्ठ गुप्तचर अधिकारी असून त्याच्याकडे भारतात एजंटांचे मोठे नेटवर्क आहे. खुर्रमच्या सूचनेनुसार जांबुरेने भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी गुप्तचरांना पैसे हस्तांतरित केले. एसटीएफच्या तपासात असे दिसून आले की जांबुरेने व्हाट्सअपवर किमान सात पाकिस्तानी आणि १० नायजेरियन नागरिकांशी संपर्क केला. 

कोण आहे अभिजित जांबूरे?

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या जांबुरे याने गुजरातमधील आणंद येथील सरदार पटेल विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तो पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करत होता. जांबुरे गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठातील पदवीधर आहे. त्याने सांख्यिकी विषयातील पदवी मिळवली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPakistanपाकिस्तानCrime Newsगुन्हेगारीArrestअटक