भारत-पाक सीमेवरील जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी अश्वारूढ पुतळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 10:00 IST2026-02-25T09:59:45+5:302026-02-25T10:00:09+5:30
पुतळ्याची निर्मिती पुण्यातील ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विपुल आणि विराज खटावकर यांनी केली आहे

भारत-पाक सीमेवरील जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी अश्वारूढ पुतळा
पुणे : भारत-पाक सीमेवरील जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे ९ मराठा रेजिमेंट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून, भारतीय जवानांसाठी प्रेरणादायी ठरणारे हे स्मारक देशभक्तीची भावना अधिक दृढ करणार असल्याची माहिती ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात या पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात मुंबईत ‘शिवस्वराज्य यात्रा’ आणि ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे पाणी व माती स्मारकासाठी पूंछ येथे नेण्यात येणार आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील राज्यातील किल्ल्यांच्या मातीचा समावेश भूमिपूजनासाठी करण्यात येणार आहे. या पुतळ्याची निर्मिती पुण्यातील ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विपुल आणि विराज खटावकर यांनी केली आहे.