जून्या भांडण्याच्या रागातून कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न

By नितीश गोवंडे | Updated: October 9, 2023 15:36 IST2023-10-09T15:36:02+5:302023-10-09T15:36:33+5:30

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

An attempt to kill Junya by stabbing him with a coyote out of anger | जून्या भांडण्याच्या रागातून कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न

जून्या भांडण्याच्या रागातून कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे: रस्त्याने जात असलेल्या बहिण-भावाला बघून चार जणांनी जून्या भांडणाचा राग मनात धरून एकावर कोयत्याने वार करत करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रेयस प्रविण खेनट (२७, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश रसाळ, गणेश वाघमारे, अजय शेलार आणि विठ्ठल ढावरे (२०, सर्व रा. आंबेगाव खुर्द) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विठ्ठल ढावरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रेयस याचा मित्र सुरज परदेशी हा त्याच्या बहिणीसोबत रविवारी (८ ऑक्टोबर) मध्यरात्री बाराच्या सुमारास आंबेगाव खुर्द येथून घरी जात होता. यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून सुरजच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार वार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याव्यतिरिक्त सुरजला आरोपींनी मारहाण देखील केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मिटारे करत आहेत.

Web Title: An attempt to kill Junya by stabbing him with a coyote out of anger