Pune: अपघात झाला एकाकडून, गुन्हा दुसऱ्यावर दाखल; चालकाच्या कबुलीनंतर प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 18:33 IST2023-07-11T18:32:19+5:302023-07-11T18:33:37+5:30
रुग्णवाहिकेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता...

Pune: अपघात झाला एकाकडून, गुन्हा दुसऱ्यावर दाखल; चालकाच्या कबुलीनंतर प्रकार उघड
ओतूर (पुणे) : ओतूर येथील बस स्थानकावर रुग्णवाहिका मागे घेताना नजरचुकीने अपघात होऊन त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये रज्जाक मगन मुंढे (वय ६५ रा. ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे) यांचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
यावेळी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका चालक कुणाल डुंबरे याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत फिर्याद दिली होती. त्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. परंतु अपघातावेळी कुणाल डुंबरे हा रुग्णवाहिकेचा चालकच नव्हता. त्यावेळी शामसुंदर राजाराम राम (वय २५) हा चालक होता.
शामसुंदरने रुग्णवाहिका चालवण्यासाठी मी स्वतः असल्याने सदर गुन्हा नजरचुकीने दुसऱ्या चालकावर झाल्याचे कबुली जबाबात म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दत्तू तळपाडे हे करत आहेत.