शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर मतदार संघातून अमोल कोल्हेच लढणार; कोल्हे-लांडेंच्या वादाला शरद पवारांकडून पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 19:10 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेच्या जागेवर दावा ठोकला होता

पुणे : शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भाजपा सलगीच्या सोशल मिडीयावरील चर्चांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी शिरूरवर दावा ठोकला आहे. लांडे यांनी दंड थोपटल्याने शिरूरसाठी कोल्हे की लांडे यांच्यापैकी कोणास संधी मिळणार याबाबत राजकीय वतुर्ळात चर्चा रंगली होती. तेव्हा ‘‘पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण’ अशा शब्दांत डॉ. कोल्हें यांनी चर्चा फेटाळून लावली होती. अखेर या चर्चेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पूर्णविराम दिला आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातून अमोल कोल्हे लढणार असल्याचे पवारांनी सांगितले आहे.  

लोकसभा निवडणूका वर्षावर आल्या आहेत. त्यामुळे राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. गेल्या वर्षभरापासून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे शिवप्रताप गरूडझेप आणि शंभूराजे महानाट्याच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसून येत नाहीत. तसेच चिंचवड विधानसभा आणि पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात ते दिसले नाहीत. त्यामुळे  कोल्हे यांची भाजपा सलगी सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वतुर्ळात होती. तर कोल्हे लोकसभा निवडणूक लढणार की नाहीत? याबाबतही सोशल मिडीयावर चर्चा रंगली होती.  त्यानंतर माजी आमदार यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ‘संधी दिली तर निवडणूक लढविणार आणि निवडूण येणार? असे सूचक विधान केले होते. तर त्यास सोशल मिडीयावरून खासदार कोल्हे यांनी उत्तर दिले आहे. ‘शिवप्रताप गरूडझेप चित्रपटाच्या निमित्ताने झालेली भेटीस राजकीय रंग दिला. ते योग्य नाही, असे सांगून भाजपा सलगीच्या चर्चा फेटाळून लावत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता या चर्चेत तथ्य नसल्याचे दिसून आले आहे.  

२००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. पडत्या काळात आम्ही पक्षाबरोबर होतो. २०१९ पूर्वी मी सहा महिने मतदार संघात फिरलो. तत्कालीन खासदारांचा तीनटर्ममधील लेखाजोखा मांडला होता. मात्र, ऐनवेळी सेलीब्रेटी आले. आणि मला संधी मिळाली नाही. आता संधी दिली तर निवडणूक लढणार आणि जिंकून येणार असल्याचा विलास लांडे यांनी व्यक्त केला होता. 

शिरूरच्या उमेदवारीविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मला २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संधी दिली. त्यानंतर चार वर्षे मी येथील प्रश्नांसाठी प्रयत्नशील आहे. त्यात पुणे नाशिक महामार्ग आणि बैलगाडा प्रश्न, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रश्न कॅबीनेट अप्रुव्हल साठी तीस हजार कोटींची कामे सुरू होत आहे. वढू येथील छत्रपती संभाजीमहाराज समाधी परिसरासाठी निधी मंजूर झाला आहे. माझ्या सारख्या राजकीय पार्श्वभूमी नाही आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरूणांस संधी दिली. मी काही दावा करणे तर्कसंगत नाही. पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असे डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले होते. 

टॅग्स :PuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण