शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

“शरद पवारांना पंतप्रधान, तर अजित दादांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचंय, कामाला लागा”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2021 11:29 AM

पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून, येत्या निवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्लापिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत अमोल कोल्हेंचे वक्तव्यशरद पवार १३ ऑक्टोबरला माजी नगरसेवकांची बैठक घेणार

पुणे: गेल्या काही दिवसांपासून आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत असून, आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  यांना पंतप्रधानपदी तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं पाहायचे आहे, अशी मोठी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. (amol kolhe says desire to see sharad pawar as a prime minister and ajit pawar as a chief minister)

पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत खासदार अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात वक्तव केले आहे. पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आली आहे. यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण दाखवून दिली पाहिजे, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी यावेळी उपस्थितांना केले. 

देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवारांना पाहायचेय

माझ्यासाठी तुम्ही जीवाचे रान केले, माझ्यासाठी पायाला भिंगरी लावून पळालात. आता तुमच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आहे. शरद पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळतेय ही भाग्याची गोष्ट आहे. शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणे गरजेचे आहे. शरद पवारांना पंतप्रधान, तर अजित दादांना मुख्यमंत्रीपदी बसलेले बघायचेय, असेही अमोल कोल्हेंनी यावेळी म्हटले आहे. 

अजित पवारांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेले बघायचेय

शिरुरच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमाला अजित पवारांसोबत होतो. त्या इमारतीचा कोपरा ना कोपरा ते पाहत होते. त्यावेळी मनात विचार आला की, याच पद्धतीने अजित दादांनी पिंपरी चिंचवड शहराची सूत्रे हातात असताना इथली प्रत्येक गोष्ट न्याहाळली असेल. पुन्हा हा योग पिंपरी चिंचवड शहरात कधी येणार? पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेले बघायचेय, ही माझी भावना आहे, असे ते म्हणाले. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येत्या निवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून येथील नेत्यांनी शरद पवार यांना पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष घाला अशी विनंती केली होती. त्यानुसार शरद पवार १३ ऑक्टोबरला माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत, तर १६ तारखेला मेळावा घेणार आहेत. शरद पवार यांना पंतप्रधान या सर्वोच्च पदावर बसलेले पाहायचे असेल, तर त्यांना पिंपरी-चिंचवड सारख्या शहरात लक्ष घालायला लागू नये, अशी भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे . 

टॅग्स :Politicsराजकारणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेस