Amit Shah and Nitin Gadkari campaign in Baramati | बारामतीत मोदींची नव्हे तर अमित शाह आणि नितीन गडकरींच्या होणार सभा
बारामतीत मोदींची नव्हे तर अमित शाह आणि नितीन गडकरींच्या होणार सभा

ठळक मुद्देपवार यांना शह देण्यासाठी भाजपच्या वरीष्ठांनी केले ‘मायक्रो प्लॅनिंग’

बारामती : बारामती शहरातील शारदा प्रांगणात मोदी नव्हे तर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या  सभा होणार आहेत. यामध्ये शाह यांची १९ एप्रिल ,तर २१ एप्रिल रोजी सभा होणार आहे. 
नुकतीच  १३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात नाराजी असणाऱ्या जिरायती भागात पार पडली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रथमच बारामतीत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने येत आहेत. यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे सभेला येणार असल्याची चर्चा होती.
 भाजपने कधी नव्हे ती बारामती लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील मतदार संघात तळ ठोकून आहेत. जिरायती भागातील महत्वाच्या पाणीप्रश्न सोडविण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.  बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने सुक्ष्मपातळीवर लक्ष घेतले आहे. पवार यांना शह देण्यासाठी भाजपच्या वरीष्ठांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ केले आहे.


Web Title: Amit Shah and Nitin Gadkari campaign in Baramati
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.