शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांचे अर्थशास्त्रातील योगदान समोर यावे

By admin | Updated: April 15, 2015 00:57 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दलितांचे, उपेक्षितांचे नेते म्हणून पाहिले जाते. परंतु, एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतली गेली नाही,

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दलितांचे, उपेक्षितांचे नेते म्हणून पाहिले जाते. परंतु, एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतली गेली नाही, अशी खंत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४व्या जयंतीनिमित्त आणि सिम्बायोसिस संस्थेच्या डॉ. आंबेडकर स्मारक व संग्रहालयाच्या कोनशिला समारंभाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, संजय काकडे, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. आंबेडकर स्मारक व संग्रहालयाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, ‘‘राष्ट्रीय जल आयोगाची निर्मिती आंबेडकरांनी केली तसेच भाक्रा नांगलसारखा मोठा प्रकल्प तयार करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे तेथे पाणी घेऊन जाण्याचा विचार आंबेडकरांनी केला. राज्या-राज्यांत विद्युत मंडळांची स्थापना करण्याची संकल्पना त्यांनी मांडली होती. त्यामुळे एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून देशाच्या विकासासाठी आंबेडकरांनी मांडलेले आर्थिक विचार समाजासमोर यायला हवेत.’’गिरीश बापट म्हणाले, ‘‘महामानवाच्या पुतळ्याला हार घालून भावना व्यक्त होतात. परंतु, एखाद्याचे जीवन उभे करण्यासाठी त्याला मदत करण्याची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांनी घ्यायला हवी.’’लिखाणाची जबाबदारी स्वीकारावीविकासातील आंबेडकरांचे योगदान, त्यांचे आर्थिक विचार यावर लिखाण करण्याची जबाबदारी स्वीकारावी. अभ्यासू व्यक्तीची नियुक्ती सिम्बायोसिससारख्या संस्थेने करावी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.टागोरांच्या विश्वभारती आणि सानेगुरुजींच्या आंतरभारती संकल्पनेप्रमाणे देशाला आज समानता, ऐक्याची आवश्यकता आहे. त्यामुळे समाजात ‘ऐक्य भारती’ ही संकल्पना रुजविणे आवश्यक आहे.- शां. ब. मुजुमदार, संस्थापक अध्यक्ष, सिम्बायोसिस