शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

अलोट गर्दीत वाकड-हिंजवडीत बगाड उत्साहात

By admin | Updated: April 5, 2015 00:52 IST

वाकड-हिंजवडीचे ग्रामदैवत, पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हातोबा देवाच्या पारंपरिक बगाड मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले.

४वाकड : वाकड-हिंजवडीचे ग्रामदैवत, पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हातोबा देवाच्या पारंपरिक बगाड मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले. खोबरे, भंडाऱ्याची उधळण करीत भाविकांनी ‘म्हातोबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला.४हिंजवडी गावठाणातील होळी पायथा मैदानापासून मिरवणुकीस सुरवात झाली. सांगता वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिरात झाली. बगाडासाठी गळकरी होण्याचा मान हिंजवडीतील जांभूळकर वाड्यातील तरुणाचा असतो. बगाडाचा रथ रिंगण मैदानात आल्यानंतर किसन साखरे पाटील यांनी गळकऱ्याच्या नावाची घोषणा केली. गळकरी होण्याचा मान नीलेश दत्तात्रय जांभूळकर यांना मिळाला, तर दत्तात्रय विठ्ठल साखरे आणि सतीश बाळासाहेब साखरे यांना खांदेकरी होण्याचा मान मिळाला.४कडाडणाऱ्या हलगीच्या नादात ‘पैस..पैस, म्हातोबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात गळकऱ्याला गावठाणातील म्हातोबा मंदिरात नेण्यात आले. तेथे मानाची कावड गेल्यानंतर गळकऱ्याच्या गळ्यात चाफ्याच्या फुलांची माळ आबा पारखी यांनी टाकली. येथे म्हातोबाचे दर्शन घेऊन खांदेकऱ्यांच्या साह्याने मारुती मंदिरात नेण्यात आले. पाचच्या सुमारास हजारो भाविकांच्या तुफान गर्दीत खांदेकऱ्यांनी गळकऱ्याला होळी पायथा मैदानावर आणले. येथे हिंजवडी गावच्या वतीने संदीप पंढरीनाथ साखरे आणि वाकड गावच्या वतीने सुतार समाजातील मानकरी पांडुरंग सुतार यांनी गळकऱ्याला गळ टोचला.४गळ टोचलेल्या नीलेश यांना रिंगण मैदानात नेऊन बगाडावर बसवून हजारो भाविकांच्या साक्षीने पाच गोल फेऱ्या मारण्यात आल्या. हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी आयटी अभियंत्यांचे हात उंचावले होते. गळकऱ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविक आटापिटा करीत होते. अनेक जण त्यासाठी उंच ठिकाणी गेले. पुढे ही मिरवणूक हिंजवडी, भूमकर वस्ती, केमसे वस्ती वाकडकर वस्ती, भुजबळ वस्ती येथून मार्गस्थ झाली. वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिरात मिरवणुकीची सांगता करून गळकऱ्याला मंदिरात नेण्यात आले.