घटस्फोट देण्यासाठी विवाहितेवर अनैतिक संबंधाचे आरोप; पतीसह सासू-सासर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 14:08 IST2022-01-20T14:08:31+5:302022-01-20T14:08:42+5:30

पुण्यातील एका उच्चशिक्षित कुटुंबीयांनी घरातील सुनेचा छळ करून घटस्फोट देण्यासाठी तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केलाय

Allegations of immoral relationship against a married woman for divorce Case filed against along with husband family in pune | घटस्फोट देण्यासाठी विवाहितेवर अनैतिक संबंधाचे आरोप; पतीसह सासू-सासर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

घटस्फोट देण्यासाठी विवाहितेवर अनैतिक संबंधाचे आरोप; पतीसह सासू-सासर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील एका उच्चशिक्षित कुटुंबीयांनी घरातील सुनेचा छळ करून घटस्फोट देण्यासाठी तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केलाय. याप्रकरणी तिच्या अमेरिकास्थित पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 वर्षीय विवाहितेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला ही उच्चशिक्षित असून पुण्यातीलच एका नामांकित कंपनीत काम करते. या महिलेचा पती देखील उच्चशिक्षित असून तो सॉफ्टवेअर अभियंता आहे. सध्या तो अमेरिकेतील एका नामांकित कंपनीत काम करतोय. दरम्यान लग्न झाल्यापासून आरोपीने फिर्यादीचा छळ सुरू केला. लग्नाच्या पहिल्या रात्री नंतर तुझे कोणासोबत शारीरिक संबंध होते का? अशी सतत विचारणा करून भांडणे काढून फिर्यादीला मारहाण केली. घटस्फोट देण्यासाठी फिर्यादीवर दबाव टाकण्यात आला. 

दरम्यान या सर्व प्रकारानंतर फिर्यादी महिलेने हडपसर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी 498 अ, 323, 504, 506, 34 इत्यादी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Allegations of immoral relationship against a married woman for divorce Case filed against along with husband family in pune