नीरा खोऱ्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो; चारही धरणातून विसर्ग वाढवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 14:32 IST2022-09-16T14:32:41+5:302022-09-16T14:32:51+5:30
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची दमदार बँटींग सुरु

नीरा खोऱ्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो; चारही धरणातून विसर्ग वाढवला
नीरा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची दमदार बँटींग सुरु आहे. त्यामुळे नीरा खोऱ्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो होत आहेत. क्षमतेपेक्षा धरणातपाणी येण्याचे प्रमाण ही वाढत आहे. परिणामी धरणातून पाणी सोडण्याचा वेग वाढवावा लागत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले.
(दि.16) दुपारी १२ वाजल्यापासून निरा खोऱ्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. भाटघर धरणातून ७ हजार क्युसेक्सने, निरा-देवघर ३ हजार ३१६ क्युसेक्सने, गुंजवणी धरणातून १ हजार ७८० क्युसेक्सने तर विर धरणातून तब्बल ३४ हजार ४५९ क्युसेक्सने पाणी नीरा नदीच्या पात्रात सोडले जात असल्याची माहिती नीरा पाठबंधारे विभागाने दिली आहे.