शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

चाकण, खेड परिसरातील सर्व उद्योगधंदे सुरू, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 14:32 IST

लॉकडाऊनमध्ये किंचित शिथिलता असली तरी नागरिकाना काटेकोर नियमांचे पालन करावे लागणार...

ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दुकाने उघडी ठेवता येणार: प्रांताधिकारी संजय तेली हॉटेल,मॉल,सलून,चहाचे दुकान,स्वीट मार्ट,पानटपरी व्यावसायिकांना नाही परवानगी सर्व प्रकारच्या बांधकामांना सुरु करण्यास परवानगी

राजगुरूनगर : चाकण व खेड परिसरातील ६५५ पैकी १०९ कारखाने यापूर्वीच सुरु झाले आहेत.दोन दिवसांत सर्व कारखाने सुरु करण्यात येणार आहेत.तसेच राजगुरुनगर शहर व परिसरात मंगळवार(दि.५) पासून १७ मेपर्यंत हॉटेल,मॉल,सलून,चहाचे दुकान,स्वीट मार्ट,पानटपरी वगळता इतर सर्व व्यावसायिकांना सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दुकाने उघडी ठेवता येणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी संजय तेली यांनी दिली. खेड तालुक्यातील दारूची दुकाने सकाळी ७ ते दोन याच वेळात सुरु राहतील. परमिट रूम,बियर बार चालविण्यास पूर्णपणे बंदी आहे. तसेच सर्व प्रकारच्या बांधकामांना सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले.         प्रांतधिकारी तेली म्हणाले की,पुणे जिल्हा रेड झोन आहे. कोरोना रुग्ण नसला तरी लगतचा तालुका म्हणून खेड ऑरेंज झोनमध्ये आहे.म्हणून यापुढील लॉकडाऊनमध्ये किंचित शिथिलता असली तरी नागरिकाना काटेकोर नियमांचे पालन करावे लागणार आहे.बाजारपेठेत किंवा गर्दीच्या ठिकाणी ६५ वर्षावरील आणि १० वर्षांखालील व्यक्तीना पूर्णपणे मज्जाव आहे.दुचाकीवर एक आणि चारचाकीत चालकासह चौघेजण ये-जा करू शकतील.सार्वजनिक अथवा कामाच्या ठिकाणी प्रत्येकाला मास्क बंधनकारक आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवा चोवीस तास सुरु राहतील.सकाळी सहा ते नऊ या वेळात दुध खरेदी विक्री करता येणार आहे. हायवेवरील ढाबे वगळता सर्व हॉटेल पार्सलसह पूर्णपणे बंद राहतील. असे संजय तेली यांनी सांगितले. ...........................कामगार व कुटुंबाची उपासमार होईल या भीतीपोटी आणि हाताला काम नसल्याने पर जिल्हा व परप्रांतीय कामागारांचे लोंढे गावाकडे निघाले आहेत.त्यांना जाण्याची सुविधा निर्माण करून देतानाच जागेवर थोपविण्याच्या हेतूने तालुक्यातील सर्व कारखाने सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.कामगारांची ३३ टक्के उपस्थिती,सोशल डिस्टन्सिंग व नियमात प्रवास करून काम करण्यास मुभा देण्यात आली आहे.एक तासाचे अंतर ठेऊन दिवसभरात दोन शिफ्टमध्ये कारखाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसायMIDCएमआयडीसीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामChakanचाकण