शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

दारू व्यावसायिकाची आत्महत्येची धमकी

By admin | Updated: September 25, 2016 04:52 IST

निंबूत (ता. बारामती) येथील महिलांनी २ दिवसांपूर्वी येथील दारू व्यावसायिकाविरुद्ध आवाज उठवून दारूधंदा उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर दारूधंदेवाल्याने कर्जबाजारी

सोमेश्वरनगर : निंबूत (ता. बारामती) येथील महिलांनी २ दिवसांपूर्वी येथील दारू व्यावसायिकाविरुद्ध आवाज उठवून दारूधंदा उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर दारूधंदेवाल्याने कर्जबाजारी असल्याचा कांगावा करीत दारूधंदा पुन्हा सुरू करू न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी देऊन महिलांवर दबाव आणला. याप्रकरणी लक्ष्मीनगर व आनंदनगर महिलांनी थेट करंजेपूल पोलीस दूरक्षेत्र गाठून याबाबत धमकी देणाऱ्या दारू व्यावसायिकाच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. करंजेपूल पोलीस दूरक्षेत्र येथे महिला व ग्रामस्थ यांनी पोलीस कॉन्स्टेबल बोहार्डे यांच्याकडे निवेदन दिले. निवेदनात अध्यक्षा उषा पवार, ग्रामपंचायत सदस्या शीतल पवार, जयश्री शिंदे, मनीषा पवार, ताराबाई जाधव, जयश्री परखंदे, संजय पवार, हिंदुराव जाधव, रावसाहेब बामणे, सुभाष आटोळे, विठ्ठल जाधव, सोपान आटोळे, पूनम जाधव, मोनाली पवार आदी ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, आमदार अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आदींना पाठविण्यात आल्याचे या वेळी महिलांनी सांगितले. लक्ष्मीनगर व आनंदनगर परिसरात प्रकाश चैनसिंग नवले व त्यांचे नातेवाईक यांचा अवैध गावठी दारूधंदा अनेक वर्ष चालू होता. याबाबत अनेकदा पोलिसांना तोंडी व लेखी निवेदन देऊनही पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्याने हा धंदा महिलांनी स्वत:हून गुरूवारी उद्ध्वस्त केला होता.प्रकाश नवले याचा दारूधंदा बंद पडल्याने कर्जबाजारी असल्याचे सांगून तो वस्तीतील काही लोकांना दारूधंदा पुन्हा सुरू करण्याची विनंती करीत आहे. तसे न झाल्यास तो त्याच्या कुटुंबीयांसह आत्महत्या करण्याची धमकी देत आहे.