शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

मद्यसेवन, पत्नीला मारहाण, मानसिक त्रास अखेर घटस्फोट; पत्नीला १० लाख पोटगी, सोने, लग्नखर्च मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:34 IST

10 लाख रुपये देणे, मुलीचा ताबा पत्नीकडे देणे, लग्नात केलेला संपूर्ण खर्च पत्नीला देणे तसेच पुढील तीन महिन्यांत संपूर्ण सोने, स्त्रीधन, भेटवस्तू पत्नीला देण्याबरोबरच पत्नी आणि तिच्या कुटुंबियांशी संपर्क न करणे असे आदेश

पुणे: मद्याचे भरपूर सेवन, पत्नीला मारहाण, शिवीगाळ असा सततचा शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पत्नीने घटस्फोटासाठी केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयाने मंजूर करीत पतीला चांगला दणका दिला. एक वर्षाच्या लढ्यानंतर पत्नीला दिलासा मिळाला आहे. पत्नीला कायमस्वरुपी पोटगीसह सहा महिन्याच्या आता 10 लाख रुपये देणे , मुलीचा ताबा पत्नीकडे देणे, लग्नात केलेला संपूर्ण खर्च पत्नीला देणे तसेच पुढील तीन महिन्यांत संपूर्ण सोने, स्त्रीधन, भेटवस्तू पत्नीला देण्याबरोबरच पत्नी आणि तिच्या कुटुंबियांशी संपर्क न करणे असा आदेश कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शुभांगी यादव यांनी पतीला दिला आहे.

पत्नीच्या वतीने अँड अजिंक्य साळुंके, अँड मयूर साळुंके यांनी बाजू मांडली. अँड अमोल खोब्रागडे आणि अँड पल्लवी साळुंके यांनी सहकार्य केलॆ. स्मिता आणि राकेश ( नाव बदलेले) यांचा २००५ मध्ये प्रेमविवाह झाला. दोघेही पुण्यात एकाच परिसरात राहत असल्याने एकमेकांना २० वर्षांहून अधिक काळ ओळखत होते. शिक्षण घेत असताना एकमेकांशी मैत्री आणि प्रेम निर्माण झाले आणि दोघांनीं लग्न केले. लग्नाचा सर्व खर्च तिच्या पालकांनी केला. संसार सुरळीत चालू असताना राकेशला दारू पिण्याचे व्यसन लागले. पतीने २०११ मध्ये दारू पिऊन मानसिक आणि शारीरिक छळ केल्याबद्दल स्मिताने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. कुटुंब आणि मुलाच्या दैनंदिन गरजा ती स्वतःच पूर्ण करत होती. पती काहीही करत नव्हता आणि जास्त मद्यपान करण्याच्या सवयीमुळे संपूर्ण कुटुंबाची परिस्थिती बिघडली होती. त्यामुळे ती २०१३ पासून पतीपासून विभक्त राहू लागली. पतीने तिच्यासह मुलीवर सतत मानसिक आणि शारीरिक अत्याचार केल्यामुळे स्मिताने स्वतःच्या विवेकबुद्धी आणि पत्नीच्या मुलीच्या कल्याणासाठी ती त्याच्याबरोबर राहू शकत नव्हती . पती तिचे आणि तिच्या मुलीचे काहीतरी नुकसान करेल आणि आपल्यावर खोटे आरोप करेल. म्हणून, पत्नीने घटस्फोट चा अर्ज मान्य करण्याची विनंती करीत, अँड अजिंक्य साळुंके, अँड मयूर साळुंके यांच्यामार्फत न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. पत्नीने पतीला परस्परसंमतीने घटस्फोटाची विनंती केली; मात्र पतीने प्रत्येक वेळी नकार दिला आणि पत्नीला इशारा दिला की तो पत्नीला इतक्या सहजासहजी मुक्त होऊ देणार नाही. मात्र न्यायालयाने पत्नीच्या घटस्फोट,  मुलीचा ताबा, कायमस्वरूपी पोटगी,  लग्नाचा सर्व खर्च, पत्नीचे सर्व स्त्रीधन आणि पतीने पत्नीला संपर्क न करण्याचा आदेश देत, पत्नीच्या घटस्फोट अर्जास मान्यता देवून पतीला चांगलाच दणका दिला. 

न्यायालयाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे घडले असेल की न्यायालयाने पत्नीला पोटगीसह लग्नात केलेला खर्च आणि स्त्रीधनाच्या सर्व गोष्टी पतीला देण्याचे आदेश दिले आहेत. या निकालामुळे पीडित पत्नींना न्याय मिळू शकेल- अँड अजिंक्य साळुंके, पत्नीचे वकील

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयmarriageलग्नMONEYपैसाhusband and wifeपती- जोडीदारFamilyपरिवारHomeसुंदर गृहनियोजन