बारामतीत विमानतळावर डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:41 IST2026-02-12T16:40:51+5:302026-02-12T16:41:14+5:30
या पाहणीत विमानतळ सुरक्षा, धावपट्टी, आपत्कालीन व्यवस्था याबाबत माहिती आदींची या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची चर्चा आहे.

बारामतीत विमानतळावर डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला १४ दिवस उलटून गेले आहेत. या अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी विविध आरोप करीत प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानंतर तपासाला वेग आला आहे.
बारामतीत विमानतळावर मंगळवारी (दि.१०) सायंकाळी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली आहे. या पाहणीत विमानतळ सुरक्षा, धावपट्टी, आपत्कालीन व्यवस्था याबाबत माहिती आदींची या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची चर्चा आहे.
बुधवारी (दि. ११) दुपारी हे अधिकारी बारामतीतून रवाना झाले. मात्र, या अधिकाऱ्यांच्या दौऱ्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. तसेच त्यांनी केलेल्या पाहणी दौऱ्याचा तपशील याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.