Ajit pawar plane crash : अपघातप्रकरणी विमान कंपनीच्या संचालकांची सीआयडीकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:22 IST2026-03-06T11:21:55+5:302026-03-06T11:22:22+5:30

विमान अपघात प्रकरणाची नोंद बारामती पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

ajit pawar plane crash CID questions airline directors in accident case | Ajit pawar plane crash : अपघातप्रकरणी विमान कंपनीच्या संचालकांची सीआयडीकडून चौकशी

Ajit pawar plane crash : अपघातप्रकरणी विमान कंपनीच्या संचालकांची सीआयडीकडून चौकशी

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) व्हीएसआर कंपनीचे संचालक व्ही. के. सिंग यांची गुरुवारी चौकशी करण्यात आली. अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे २८ जानेवारीला मुंबईहून बारामतीकडे विमानातून निघाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीत आले होते. सकाळी आठच्या सुमारास मुंबईहून विमानाने उड्डाण केल्यानंतर बारामती विमानतळावर विमान उतरण्याच्या तयारीत असताना अपघात झाला. या अपघातात पवार यांच्यासह वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अटेंडंट पिंकी माळी, पवार यांचा अंगरक्षक विदीप जाधव यांचा मृत्यू झाला. विमान अपघात प्रकरणाची नोंद बारामती पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. बारामती पोलिस ठाण्यातील दाखल प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू केला आहे. 

अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर वैमानिक, तसेच वैमानिकाचा हलगर्जीपणा किंवा घातपात असा संशय व्यक्त केला असताना आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेऊन विमान कंपनीवर गंभीर आरोप केले होते. डीजीसीए (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन), तसेच एएआयबी (एअरक्राफ्ट अॅक्सिडेन्ट इन्व्हीस्टीगेशन ब्यूरो) यांच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. ५) व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे संचालक व्ही. के. सिंग यांना चौकशीसाठी बोलावले होते.

व्ही. के. सिंग हे गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांचा मुलगा रोहित यांच्यासह सीआयडीच्या पाषाण रस्त्यावरील कार्यालयात आले. 'विमानाची ऑपरेशन प्रक्रिया, मेंटेनन्स रेकॉर्ड, तांत्रिक बाबी, सुरक्षा नियमांचे पालन, अपघाताशी संबंधित अन्य मुद्द्यांबाबत त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली', अशी माहिती सीआयडीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title : अजित पवार विमान दुर्घटना: विमान कंपनी के निदेशक से सीआईडी की पूछताछ

Web Summary : सीआईडी ने बारामती में अजित पवार के विमान दुर्घटना के संबंध में वीएसआर वेंचर्स के निदेशक वी.के. सिंह से पूछताछ की। यह रोहित पवार द्वारा दुर्घटना के बाद लापरवाही के आरोपों के बाद हुआ है, जिसमें अजित पवार सहित पांच लोगों की मौत हो गई। जांच में परिचालन प्रक्रियाएं और रखरखाव रिकॉर्ड शामिल हैं।

Web Title : Ajit Pawar Plane Crash: Aviation Company Director Questioned by CID

Web Summary : CID investigated VSR Ventures director V.K. Singh regarding Ajit Pawar's plane crash in Baramati. This follows allegations of negligence by Rohit Pawar after the accident that killed five, including Ajit Pawar. The investigation covers operational procedures and maintenance records.