बारामती : वेळ सकाळची. नेहमीप्रमाणे घराच्या बाजूला कामे सुरू होती. त्यावेळी अचानक एक विमान आकाशात घिरट्या घालताना निदर्शनास आले. थोड्या वेळात पुन्हा त्याच विमानाने घिरटी घातली. पण, यावेळी घिरटी घालत असताना हवेतच त्याने दोन-तीन वेळा आलटी-पलटी घेतली अन् क्षणार्धात आमच्या घराच्या जवळच असलेल्या शेतात कोसळल्याची माहिती गोजुबावी (ता. बारामती) येथील प्रत्यक्षदर्शी अतुल आटोळे व अनिता आटोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, गोजुबावीचे माजी सरपंच राघू आटोळे यांचे विमानतळानजीक शेतात घर आहे. आमचे जनावरांसाठी दूध व चाऱ्याचे काम सुरू होते. यावेळी अनिता आटोळे यांचा मुलगा आर्यन, दीर अतुल आटोळे गाईच्या गोठ्यात काम करीत असताना सकाळी ८:३० च्या सुमारास विमान धावपट्टीवर येण्यापूर्वी आकाशात एक घिरटी घेताना दिसले. नंतर दुसऱ्या वेळी ८:४५ वा.दरम्यान विमान धावपट्टीवर येण्याच्या प्रयत्नात असताना गोजुबावी हद्दीतील मंदिराच्या उंचीइतके खाली आले. परंतु, वैमानिकाला ते विमान पुन्हा धावपट्टीवर आणता आले नाही. याच वेळी धावपट्टी सुरू होण्यापूर्वी विमान वेगात खाली येताना आकाशात दोन-तीन वेळा आलटी-पलटी झाले. त्यानंतर विमान आमच्या वस्तीच्या बाजूला दगडावर कोसळले. सुरुवातीला एक छोटा स्फोट झाला, नंतर मोठा, असे दोन स्फोट झाले. यात विमानाने पेट घेतला.
माझा मुलगा आर्यन, दीर अतुल आम्ही मदतीसाठी धावलो. परंतु, उशीर झाला होता. विमानातील सर्व प्रवासी बाहेर फेकले गेले होते. सुरुवातीला शिकाऊ विमान असेल, असा आमचा समज झाला. परंतु, विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी आलेले कार्यकर्ते लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी विमानात उपमुख्यमंत्री अजितदादा असल्याचे समजले. महाराष्ट्रातील जनतेच्या व बारामतीच्या लाडक्या दादांना आम्ही शेवटची मदत पोहोचवू शकलो नसल्याची खंत प्रत्यक्षदर्शी अनिता आटोळे व अतुल आटोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
Web Summary : Eyewitnesses recount seeing a plane spiraling and crashing near Baramati. Initially, there were rumors that Deputy Chief Minister Ajit Pawar was on board, but these claims were later confirmed to be false. Locals rushed to help after the crash.
Web Summary : प्रत्यक्षदर्शियों ने बारामती के पास एक विमान को घूमते हुए और दुर्घटनाग्रस्त होते हुए देखा। शुरू में अफवाह थी कि उपमुख्यमंत्री अजित पवार विमान में थे, लेकिन बाद में ये दावे गलत साबित हुए। दुर्घटना के बाद स्थानीय लोग मदद के लिए दौड़े।