Ajit Pawar Passed Away : झेंड्याखाली एकत्र पाहण्याचे स्वप्न अपूर्णच…; बारामतीकरांच्या डोळ्यांत पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:21 IST2026-01-28T16:19:21+5:302026-01-28T16:21:03+5:30

- नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढविली.

Ajit Pawar Passed Away The dreams of the people of Baramati remained unfulfilled. | Ajit Pawar Passed Away : झेंड्याखाली एकत्र पाहण्याचे स्वप्न अपूर्णच…; बारामतीकरांच्या डोळ्यांत पाणी

Ajit Pawar Passed Away : झेंड्याखाली एकत्र पाहण्याचे स्वप्न अपूर्णच…; बारामतीकरांच्या डोळ्यांत पाणी

बारामती - पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर बारामतीकरांना धक्का बसला होता. या राजकीय घडमोडीनंतर दुखावलेले बारामतीकर काळजावर दगड ठेवून खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या निवडणुकीला सामोरे गेले. त्यानंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने चर्चा सुरु झाली.

अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!

नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढविली. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत हेच सूत्र ठेेवण्यात आले. नुकत्याच झालेल्या एआय सेंटर आणि कृषक २०२६ च्या उद्घाटनाच्या वेळी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्याचे पाहून बारामतीकर सुखावले होते.



लवकरच पवार कुटुंब एकत्र येण्याची घोषणा कानावर येण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची बातमी येऊन धडकली. राजकीय भूमिकांनी आम्ही वेगवेगळे असलो तरी आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी वेळोवेळी सांगितले. मात्र, हे कुटुंब एकाच राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली पाहायचे बारामतीकरांचे स्वप्न अपूर्णच राहिले.

Web Title : अजित पवार के निधन से बारामती का संयुक्त पवार परिवार का सपना टूटा

Web Summary : बारामती अजित पवार के आकस्मिक निधन पर शोक मना रहा है। स्थानीय चुनावों और सार्वजनिक कार्यक्रमों में हालिया सहयोग के बावजूद, एक झंडे के नीचे पवार परिवार को एकजुट करने की उम्मीदें धराशायी हो गईं।

Web Title : Ajit Pawar's Death Dashes Baramati's Dream of United Pawar Family

Web Summary : Baramati mourns Ajit Pawar's sudden death. Hopes for the Pawar family uniting under one flag are dashed, despite recent collaborations in local elections and public events.