Ajit Pawar Passed Away : संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली..! बारामती शुकशुकाट, बाजारपेठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:03 IST2026-01-28T17:01:49+5:302026-01-28T17:03:12+5:30
अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण बारामतीमध्ये सध्या शुकशुकाट असून, काटेवाडी गावात कुठल्याच घरात चूल पेटली नसल्याचे समोर आले आहे.

Ajit Pawar Passed Away : संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली..! बारामती शुकशुकाट, बाजारपेठा बंद
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. मुंबई येथून सकाळी बारामती येथे अजित पवार विमानाने आले. बारामतीत विमान लँड करत असतानाच भीषण अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले.
अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण बारामतीमध्ये सध्या शुकशुकाट असून, काटेवाडी गावात कुठल्याच घरात चूल पेटली नसल्याचे समोर आले आहे. तसेच काटेवाडी या गावात एक लग्न समारंभ होणार होता, तो देखील रद्द करण्यात आला आहे.
अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!
अजित पवारांना बारामती भागातून मानणारा एक मोठा वर्ग आहे. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी अजित पवारांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे बारामती शहरात वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. अजित पवार यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांची रस्त्यावर गर्दी झाले असून, काही कार्यकर्ते चालत निघाले आहेत. शिवाय शहरातील मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत. प्रमुख रस्त्यांसह शहरात सर्वच ठिकाणी कार्यकर्ते, चाहते, दादांना मारणारा प्रचंड जनसमुदाय एकत्रित जमले असून, दादा अमर रहे च्या घोषणा देत आहेत.