Ajit Pawar Passed Away : ‘शब्दाला पक्के, ग्रामीण महाराष्ट्राचे नस ओळखणारे नेते हरपले’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 16:19 IST2026-01-29T16:18:22+5:302026-01-29T16:19:11+5:30

संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे; राज्य सरकारने ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला.

Ajit Pawar Passed Away 'Leaders who are true to their word and know the essence of rural Maharashtra have been lost' | Ajit Pawar Passed Away : ‘शब्दाला पक्के, ग्रामीण महाराष्ट्राचे नस ओळखणारे नेते हरपले’

Ajit Pawar Passed Away : ‘शब्दाला पक्के, ग्रामीण महाराष्ट्राचे नस ओळखणारे नेते हरपले’

राजगुरुनगर :बारामतीजवळील विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना Learjet 45 चार्टर विमान लँडिंगदरम्यान क्रॅश झाले; अजितदादांसह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. विमान आग लागून जळून खाक झाले. संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे; राज्य सरकारने ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला.

खेड तालुका शिक्षणप्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील यांनी भावुक होऊन श्रद्धांजली वाहिली - "अजितदादांचे आमचे कौटुंबिक नाते होते. शैक्षणिक कामांसाठी अनेकदा भेटी, चर्चा व्हायच्या. खेड तालुक्यातील शिक्षणाला त्यांचा कायम पाठिंबा होता. २००१ मध्ये साहेबराव बुट्टे पाटील यांच्या निधनानंतर सांत्वनासाठी ते आमच्या घरी आले. २००३ मध्ये महाविद्यालयातील पुतळ्याचे अनावरण, २००५ मध्ये विद्यार्थिनी वसतिगृह उद्घाटन... एकत्र जेवण, गप्पा, कुटुंब फोटो – त्या आठवणी आज डोळ्यांत येऊन अश्रू आणतात."

ते पुढे म्हणाले, "राजकीय मतभेद असले तरी दादांबरोबरचा स्नेह कायम होता. शब्दाला पक्के, राजकारणापलीकडे सर्वांना मदत करणारे, ग्रामीण महाराष्ट्राचे नस ओळखणारे नेते आज आपल्यातून निघून गेले. बारामती, पुणे, संपूर्ण राज्याचे नुकसान झाले. खेड तालुका शिक्षणप्रसारक मंडळाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो." 

Web Title : अजित पवार का विमान दुर्घटना में निधन: महाराष्ट्र में शोक

Web Summary : उपमुख्यमंत्री अजित पवार का बारामती के पास एक विमान दुर्घटना में दुखद निधन हो गया। Learjet 45 लैंडिंग के दौरान दुर्घटनाग्रस्त हो गया, जिससे सभी पांच लोगों की मौके पर ही मौत हो गई। महाराष्ट्र शोक में डूबा हुआ है, तीन दिन का शोक घोषित किया गया है। शिक्षा के लिए उनके समर्थन और ग्रामीण महाराष्ट्र के प्रति समर्पण को याद किया गया।

Web Title : Ajit Pawar Dies in Plane Crash: Maharashtra Mourns Loss

Web Summary : Deputy Chief Minister Ajit Pawar tragically died in a plane crash near Baramati. The Learjet 45 crashed during landing, killing all five on board. Maharashtra mourns, declaring three days of mourning. Tributes pour in, highlighting his support for education and dedication to rural Maharashtra.