पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या वेळेच्या शिस्तीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. शिस्तप्रिय नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून ते ओळखले जातात. असाच एक जुना किस्सा काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजू राऊत यांनी सांगितला. २००५ सालची ही घटना असून, दादांच्या वक्तशीरपणाचा प्रत्यय तेव्हा उपस्थितांना आला होता.
२००५ मध्ये अजित पवार राज्याचे जलसंपदामंत्री असताना पुण्यातील लष्कर भागातील नवा मोदीखाना परिसरात एका पतपेढीच्या उद्घाटनासाठी आले होते. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ठीक ४ वाजताची होती. दादा बारामतीहून निघून बरोबर वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचले. मात्र, याच भागात राहणारे तत्कालीन राज्यसभा खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांना पोहोचायला थोडा उशीर झाला.
अजित पवार आपले बालपणीचे मित्र ओमप्रकाश गुप्ता यांच्या हॉटेलवर बसले असताना खासदार चव्हाण तिथे आले. त्यावेळी आपल्या कडक आणि स्पष्टवक्ते स्वभावानुसार दादांनी त्यांना सुनावले, ‘चव्हाण साहेब, मी बारामतीवरून वेळेत कार्यक्रमाला आलो; पण तुम्ही इथल्या इथे राहूनही उशिरा येता?’ दादांच्या या रोखठोक विधानामुळे नियोजनाबाबत ते किती पक्के आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
Web Summary : Ajit Pawar, known for his punctuality, once reprimanded a Rajya Sabha MP for arriving late to an event in Pune despite living nearby, highlighting Pawar's strict adherence to schedule.
Web Summary : अजित पवार, अपनी समयनिष्ठा के लिए जाने जाते हैं, उन्होंने एक बार राज्यसभा सांसद को पुणे में एक कार्यक्रम में देर से पहुंचने पर फटकार लगाई, जबकि वे पास में ही रहते थे। इससे पवार की समय के प्रति सख्त प्रतिबद्धता उजागर होती है।