Ajit Pawar Passed Away : विमान ढगांत शिरताच अजित पवारांना वाटायची भीती;अजित पवारांचा जुना व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 19:34 IST2026-01-28T19:32:47+5:302026-01-28T19:34:01+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा १७ जुलै २०२४ रोजीचा हा व्हिडीओ आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Ajit Pawar Passed Away Ajit Pawar felt scared as soon as the plane entered the clouds; Old video of Ajit Pawar goes viral | Ajit Pawar Passed Away : विमान ढगांत शिरताच अजित पवारांना वाटायची भीती;अजित पवारांचा जुना व्हिडीओ व्हायरल

Ajit Pawar Passed Away : विमान ढगांत शिरताच अजित पवारांना वाटायची भीती;अजित पवारांचा जुना व्हिडीओ व्हायरल

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पण, विमानात बसल्याचा अनुभव सांगणारी दादांची पावणेदोन वर्षांपूर्वीची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात दादांनी ढगामध्ये शिरतानाचा थरारक किस्सा सांगितला असून, कसं ‘पांडुरंगा, पांडुरंगा’ धावा सुरू केला आणि विमान प्रवास सुखरूप झाल्याचे सांगत सुटकेचा नि:श्वास सोडला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा १७ जुलै २०२४ रोजीचा हा व्हिडीओ आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार भाषणादरम्यान विमान प्रवासातील एक अनुभव सांगितला होता. ते म्हणाले, विमान ढगांमध्ये शिरल्यानंतर बाहेर काहीच दिसत नव्हते. ना झाडे, ना जमीन, सर्वत्र केवळ ढगच ढग दिसत होते. ही परिस्थिती पाहून देवेंद्र फडणवीस यांना म्हणालो, “इकडे-तिकडे सगळीकडे ढगच दिसत आहेत, जरा बाहेर बघा. 

यावर देवेंद्र फडणवीस यांनी मिश्कील शैलीत उत्तर दिले, “आतापर्यंत माझे सहा अपघात झाले आहेत. मी जेव्हा विमानात असतो, तेव्हा अपघात झाले तरी मला काही होत नाही. तुम्हीही निवांत बसा, काही होणार नाही. मात्र, परिस्थिती गंभीर वाटत असल्याने माझ्या मनात भीती निर्माण झाली होती. माझ्या पोटात गोळा आला होता. तो दिवस एकादशीचा होता. मी मनोमन ‘पांडुरंगा, पांडुरंगा’ असे म्हणत बसलो होतो, अखेर हा विमानप्रवास सुखरूप पार पडला आणि सर्वजण सुरक्षित पोहोचले.”  सध्या हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

Web Title : अजित पवार के विमान डर की मौत की अफवाहों के बाद वायरल वीडियो में वापसी।

Web Summary : अजित पवार का विमान में डर का पुराना वीडियो झूठी मौत की अफवाहों के बीच वायरल हो रहा है। उन्होंने बादलों के बीच उड़ान भरने के एक भयानक अनुभव का वर्णन किया, सुरक्षित मार्ग के लिए 'पांडुरंगा' का जाप किया। उन्होंने देवेंद्र फडणवीस के साथ घटना साझा की, सुरक्षित उतरने पर अपनी राहत को याद किया।

Web Title : Ajit Pawar's plane fear resurfaces in viral video after death rumors.

Web Summary : Old video of Ajit Pawar recounting his fear during a flight goes viral amidst false death rumors. He described a harrowing experience flying through clouds, chanting 'Panduranga' for safe passage. He shared the incident with Devendra Fadnavis, recalling his relief upon landing safely.