पुणे - पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत पालकमंत्री, लाडके नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रती आदरांजली अर्पण केली.
बुधवारी आणि गुरुवारी सायंकाळपर्यंत शहरातील सर्वच दुकाने बंद होती.
यात लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, रविवार पेठ, अप्पा बळवंत चौक, तुलसी बाग, तापकीर गल्ली, फडके हौद, बुधवार पेठ या प्रमुख बाजारपेठेत नि:शब्द या तीनच अक्षरात भावपूर्ण श्रद्धांजलीचे पोस्टर उभारून समस्त व्यापारी बांधवांनी बाजारपेठ बंद ठेवली होती.
गल्ली बोळातील छोटी छोटी दुकानेदेखील बंद होती. बारामतीत अंत्यसंस्कार सुरू असताना, पुण्यातील रस्त्यांवर चिटपाखरू देखील नव्हते.
घराघरात टीव्हीवरून अंत्यसंस्काराचे लाइव्ह प्रक्षेपण पाहत होते. हा कार्यक्रम संपताच अत्यंत जड अंतःकरणाने पुणेकर घराबाहेर पडले आणि रस्त्यांवरची वर्दळ दुपारनंतर सुरू झाली.
Web Summary : Pune observed a complete shutdown as businesses closed to honor Deputy Chief Minister Ajit Pawar. Major markets and small shops remained closed Wednesday and Thursday, with residents watching the funeral broadcast live. The city slowly returned to normalcy in the afternoon.
Web Summary : उपमुख्यमंत्री अजित पवार के सम्मान में पुणे में पूर्ण बंद रहा। प्रमुख बाजार और छोटी दुकानें बुधवार और गुरुवार को बंद रहीं, और निवासियों ने अंतिम संस्कार का सीधा प्रसारण देखा। दोपहर में शहर धीरे-धीरे सामान्य स्थिति में लौट आया।