‘दादांची अखेरची इच्छा पूर्ण होणार’;अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजरांनी फोडला गोविंदबागेतील ‘सस्पेन्स’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 13:29 IST2026-02-01T13:25:38+5:302026-02-01T13:29:03+5:30

- गोविंदबाग येथे पार्थ पवार यांच्याशी तसेच कुटुंबातील सदस्यांशी झालेल्या चर्चेनंतर आता कोणतेही गैरसमज राहिलेले नाहीत.

Ajit Pawar Funeral 'Ajit's last wish will be fulfilled', positive decision on both nationalists coming together | ‘दादांची अखेरची इच्छा पूर्ण होणार’;अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजरांनी फोडला गोविंदबागेतील ‘सस्पेन्स’

‘दादांची अखेरची इच्छा पूर्ण होणार’;अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजरांनी फोडला गोविंदबागेतील ‘सस्पेन्स’

बारामती : सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीबाबत माहिती नसल्याचे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर गोविंदबाग निवासस्थानी पार्थ पवार यांनी भेट देत संपूर्ण पवार कुटुंबाशी सविस्तर चर्चा केली. मात्र, या चर्चेतील निर्णयाबाबत कमालीचा ‘सस्पेन्स’ कायम होता. अखेर विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त व दिवंगत अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी पुढे येत या चर्चेचा खुलासा केला. ‘अजितदादां’ची शेवटची इच्छा संपूर्ण पवार कुटुंब पूर्ण करतील, याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याचा गुजर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

किरण गुजर म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत ‘साहेबां’नी वक्तव्य केल्यानंतर कुटुंबात काहीसा कम्युनिकेशन गॅप असल्याचे जाणवले. त्यावर सविस्तर चर्चा झाली. पवार कुटुंबाने मला आपले मानले असून या प्रक्रियेत सहभागी करून घेतले. गोविंदबाग येथे पार्थ पवार यांच्याशी तसेच कुटुंबातील सदस्यांशी झालेल्या चर्चेनंतर आता कोणतेही गैरसमज राहिलेले नाहीत.”

पार्थ पवार शपथविधीला उपस्थित नसून ते बारामतीतील ‘सहयोग’ निवासस्थानी नागरिकांच्या भेटी घेत आहेत. आज पुन्हा ‘सहयोग’ येथे चर्चा झाली असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय पक्का झाल्याचे गुजर यांनी सांगितले. “अजितदादांच्या इच्छेनुसार दोन्ही पक्ष एकत्र येतील. ही प्रक्रिया असल्याने थोडा वेळ लागेल. याबाबतची अधिकृत घोषणा पक्षाच्या नेतृत्वाकडून करण्यात येईल,” असेही त्यांनी नमूद केले.

गोविंदबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार आणि रणजित पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर पार्थ पवार, युगेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार बाहेर पडले; मात्र त्यांनी माध्यमांना कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यामुळे चर्चेभोवती गूढता निर्माण झाली होती. अखेर किरण गुजर यांनी पुढे येत “मी ज्या प्रक्रियेत होतो, ती पूर्ण झाली आहे,” असे सांगत गोविंदबागेतील सस्पेन्स दूर केला.

स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळे एकत्र

गुजर यांनी पुढे सांगितले की, विद्या प्रतिष्ठानमध्ये दिवंगत अजित पवार यांचे स्मारक उभारण्यासह विविध विषयांवर ‘साहेबां’बरोबर चर्चा झाली आहे. “सगळेजण अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला असून ही अजितदादांची अखेरची इच्छा होती,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title : अजित पवार की अंतिम इच्छा होगी पूरी: किरण गुजर ने खोला रहस्य।

Web Summary : शरद पवार के बयान के बाद, गोविंदबाग में पवार परिवार के भीतर चर्चा हुई, जिसमें अजित पवार की अंतिम इच्छा को पूरा करने का निर्णय लिया गया: दोनों एनसीपी गुटों का एकीकरण। जल्द ही आधिकारिक घोषणा होने की उम्मीद है।

Web Title : Ajit Pawar's last wish to be fulfilled: Kiran Gujar reveals suspense.

Web Summary : After Sharad Pawar's statement, discussions within the Pawar family at Govindbagh led to a decision to fulfill Ajit Pawar's last wish: unification of both NCP factions. An official announcement is expected soon.