शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:52 IST

Air India Plane Pune: दिल्लीहून पुण्याला आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच पक्षी धडकला. त्यामुळे विमानाचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले.

दिल्लीवरून पुण्याला आलेल्या एका एअर इंडियाच्याविमानाला पक्ष्याची धडक बसली. विमान धावपट्टीवरून उतरल्यानंतर ही बाब समोर आली. शुक्रवारी सकाळी ७ वाजता विमान विमानतळावर आले. त्यानंतर त्याचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

एअर इंडियाचे एआय-२४६९ हे विमान दिल्लीवरून पहाटे ५.३१ वाजता निघाले होते. सकाळी ७.१४ वाजता पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर हे विमान सुरक्षितपणे उतरले.   

विमान पुणे विमानतळावर उतरल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विमानाला पक्षी धडकल्याची माहिती दिली. एअर बस कपंनीचे ३२० या श्रेणीतील हे विमान आहे. 

दिल्लीला जाणार होते विमान

हेच विमान पुण्यावरून पुन्हा दिल्लीला जाणार होते. पण, प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले. 

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फ्लाईट एआय-२४७० (एआय-२४६९ दिल्ली-पुणे) हे २० जून रोजी पुण्यावरून दिल्लीला जाणार होते, पण दिल्लीवरून येत असतानाच विमानाला पक्षाची धडक बसल्याचे आढळून आले, त्यामुळे परतीचे उड्डाण रद्द करणयात आले. विमानाला तपासणीसाठी केली जाणार आहे. 

वाचा >>अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव

प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ज्या प्रवाशांना दिल्ली जायचे त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. आमच्या प्रवाशांची सुरक्षा आमचे प्रमुख प्राधान्य असल्याचे एअर इंडियांच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

टॅग्स :airplaneविमानAir Indiaएअर इंडियाpune airportपुणे विमानतळPlane Crashविमान दुर्घटना