भोरमधून यंदा पुन्हा थोपटे विरुद्ध थोपटे

By Admin | Updated: June 11, 2015 06:03 IST2015-06-11T06:03:31+5:302015-06-11T06:03:31+5:30

पुणे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी दूध संस्था मतदारसंघातून भोर तालुक्यातून चार उमेदवारी अर्ज दाखल झाले होत. काल माघारी घेण्याच्या शेवटच्या

Against the thieves again from the dawn this year | भोरमधून यंदा पुन्हा थोपटे विरुद्ध थोपटे

भोरमधून यंदा पुन्हा थोपटे विरुद्ध थोपटे

भोर : पुणे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी दूध संस्था मतदारसंघातून भोर तालुक्यातून चार उमेदवारी अर्ज दाखल झाले होत. काल माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन जणांनी माघार घेतल्याने विद्यमान संचालक दिलीप थोपटे यांच्या विरुद्ध माजी संचालक बाळासाहेब थोपटे यांच्यात गतवेळीप्रमाणेच दुरंगी लढत होणार आहे. मात्र, दिलीप थोपटे यांना मानणारे ४७ दूध संस्थांचे मतदार अज्ञातस्थळी असल्याने, दिलीप थोपटे यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.
विद्यमान संचालक दिलीप थोपटे, माजी संचालक बाळासाहेब थोपटे, भिकोबा थोपटे व रूपाली थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काल माघारीच्या शेवटच्या दिवशी भिक ोबा थोपटे व रूपाली थोपटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
दरम्यान, एकाच घरातील तीन जणांना उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाहीत. या सहकाराच्या नियमानुसार बाळासाहेब थोपटे यांनी दिलीप थोपटे यांच्या उमेदवारी अर्जाच्या विरोधात कात्रज दूध संघाचे निवडणूक अधिकारी राठोड यांच्याकडे याचिका दाखल केला होती. मात्र, सुनावणीत निवडणूक अधिकारी यांनी सदरचा अर्ज फेटाळला. त्यामुळे बाळासाहेब थोपटे यांनी दिलीप थोपटे यांच्या उमेदवारीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, निवडणूकप्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नसल्याचे कारण देत न्यायालयाने याचिका फेटाळली. यामुळे दिलीप थोपटे यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यामुळे निवडणुकीसाठी विद्यमान संचालक दिलीप थोपटे यांच्या विरुद्ध बाळासाहेब थोपटे या भावकीतच पुन्हा एकदा सामना रंगणार आहे. तालुक्यातील ६० दूध संस्था जिल्हा संघाला दूध घालतात. त्याच संस्था मतदानाला पात्र आहेत. दिलीप थोपटे यांनी त्यांना मानणाऱ्या सुमारे ३५ ते ४५ संस्थांचे मतदार प्रतिनिधी पाठवले असून, त्यातील अनेक मतदार बाहेर आहेत. शिवाय राष्ट्रवादीला मानणारे ५ मतदार असून, त्यांचाही दिलीप थोपटे यांनाच पाठिंबा असल्याचे बोलले जाते. (वार्ताहर)

Web Title: Against the thieves again from the dawn this year