पुणे : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच विषय समिती सदस्य निवडीसाठी अभूतपूर्व गोंधळ झाला. सभागृहात चार तास नुसता पोरखेळ सुरू होता. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांपैकी निम्म्या महिला सदस्या अक्षरश: वैतागून गेल्या होत्या. तीन वेळा सभागृहातून जाण्याची धमकी दिल्यानंतरही परिस्थितीत काहीच फरक पडत नव्हता. शेवटी जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर समित्या बिनविरोध करण्यात आल्या.जिल्हा परिषदेत विविध विषय समिती सदस्य निवड आणि जिल्ह्यातील तीव्र टंचाईबाबत सर्वसाधरण सभेच्या कामकाजाला २ वाजून १५ मिनिटांनी सुरुवात झाली. मात्र, पुढच्या दोन मिनिटांनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व समित्यांचे सभापती आणि विविध पक्षांचे गटनेते हे दहा समित्यांच्या सदस्यांच्या निवडीसाठी सभागृहातून बाहेर गेले. मात्र, या वेळी सभागृह तहकूब केले आहे, अशी कोणीही घोषणा केली नाही. त्यामुळे सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे आणि विविध विभागांचे प्रमुख तसेच इतर सर्व महिला व पुरुष सदस्य वाट पाहत बसून राहिले. मात्र, तब्बल ४ तासांनंतर म्हणजे साडेसहा वाजले तरीही विषय समिती सदस्य निवडीबाबत काहीच निर्णय होत नव्हता. त्यामुळे सभागृहात उपस्थित असलेल्या जवळपास ४० महिला सदस्य या कोणतेही कामकाज होत नसल्याने पार कंटाळून गेल्या होत्या. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्यांनी आपल्या पक्षातील सदस्यांना निवड प्रक्रियेबाबत व्यवस्थित माहिती दिली नाही. तसेच, आरक्षणानुसार एकाही सदस्याने अर्ज भरला नाही. त्याचबरोबर कोणत्याही पक्षाचे सदस्य आपल्या गटनेत्यांचे ऐकत नव्हते. त्यातच भरीस भर म्हणून एकाच सदस्याने दोन-दोन समित्यांसाठी अर्ज भरल्याने आणि त्यातील कोणत्याही सदस्याने एका समितीमधून अर्ज माघारी न घेतल्याने सभागृहात गोंधळ उडाला. काही ज्येष्ठ सदस्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन महत्त्वाच्या समितीमधून माघार घेतली. इतर पक्षांच्या काही सदस्यांनी आठमुठी भूमिका घेतल्याने तोडगा निघत नव्हता. अध्यक्ष विश्वास देवकाते हे वारंवार विनंती करीत होते. मात्र तरीही सर्वपक्षीय सदस्य ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. विविध विषय समिती निवड पुढीलप्रमाणेस्थायी समिती : कुसुम काशिकर, कल्पना जगताप, रोहित पवार, रत्नप्रभा, पाटील, आशा बुचके, शरद बुट्टे-पाटील, दिलीप यादव आणि रणजित शिवतरे.बांधकाम समिती : ज्ञानेश्वर कटके, देविदास, दरेकर, दिलीप घुले, शंकर मांडेकर, वीरधवल जगदाळे, निर्मला पानसरे, बाबूराव वायकर आणि अतुल देशमुख.आरोग्य समिती : मीनाक्षी गावडे, पूजा पारगे, अभिजित तांबिले, विठ्ठल आवाळे, नितीन मराठे आणि प्रमोद काकडे.कृषी समिती : पांडुरंग पवार, रेखा बांदल, ललिता चव्हाण, पूनम दळवी, शोभा कदम, अंकुश आमले, लक्ष्मण सातपुते, स्वाती पाचुंदकर, सुनंदा शेलार आणि दत्तात्रय झुरुंगे.शिक्षण समिती : अर्चना कामठे, शलाका कोंडे, दिलीप खैरे, रणजित जगदाळे, अरुणा थोरात, सागर भोसले आणि वंदना कोद्रे.पशुसंवर्धन समिती : शुभद्रा शिंदे, संजय भोसले, गणेश कदम, वैशाली महाडिक, सविता बगाटे, ज्योती झेंडे, सीमा राऊत आणि दिनकर हरपळे.महिला व बालकल्याण समिती : शालिनी पवार, तनुजा घनवट, जयश्री भूमकर, भारती दुधाळ, कुसुम मांढरे, अनिता इंगळे आणि रविराज गावडे.अर्थ समिती : उषाताई कानडे, मीना धायगुडे, कोमल वासवले, शिवाजी उमाप, मंगल बोडके, अतुल म्हस्के आणि जयश्री पोकळे.समाजकल्याण समिती : सागर काटकर, देवराम लांडे, मंगळ जंगम, रूपा जगदाळे, सारिका पानसरे, अंजली कांबळे, अलका धानिवले, दीपाली काकडे, रूपाली कड आणि बाबा काळे.जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती : वैशाली पाटील, शरद लेंडे, पांडुरंग पवार आणि कीर्ती कांचन.
अभूतपूर्व गोंधळानंतर विषय समित्या बिनविरोध
By admin | Updated: April 16, 2017 03:58 IST
जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच विषय समिती सदस्य निवडीसाठी अभूतपूर्व गोंधळ झाला. सभागृहात चार तास नुसता पोरखेळ सुरू होता.
अभूतपूर्व गोंधळानंतर विषय समित्या बिनविरोध
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}