कुकडी प्रकल्पातून अखेर आवर्तन थांबविले, १०.६६ टीएमसी पाणी सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 12:22 AM2018-12-23T00:22:53+5:302018-12-23T00:23:10+5:30

कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या ५ धरणांतून कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ६.२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता

 After the cucumber project stopped the cycle, 10.66 TMC water released | कुकडी प्रकल्पातून अखेर आवर्तन थांबविले, १०.६६ टीएमसी पाणी सोडले

कुकडी प्रकल्पातून अखेर आवर्तन थांबविले, १०.६६ टीएमसी पाणी सोडले

Next

ओझर : कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या ५ धरणांतून कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ६.२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता, त्यानंतर पुन्हा समितीने अतिरिक्त जादा पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन प्रत्यक्षात १०.६६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. २५ वर्षांत प्रथमच ६२ दिवसांनंतर आवर्तन शुक्रवारी शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधानंतर थांबविण्यात आले. पिंपळगाव जोगा कालव्यातून शनिवारी (दि. २२) सकाळी पाणी बंद करण्यात आले. प्रथमच इतक्या मोठ्या दिवसांचे आणि दोन आवर्तन इतके सोडण्यात आलेले असल्याने उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. पाण्याचे नियोजन कोलमडल्याने जुन्नर तालुक्यात विरोधी पक्षाने पाण्याचे राजकारण करून लोकप्रतिनिधी यांना वेठीस धरण्यास सुरुवात केल्याने कुकडीचा पाणीप्रश्न पेटणार आहे, अशी चिन्हे
दिसत आहेत.
कालवा सल्लागार समितीची बैठक ३ आॅक्टोबर २०१८ ला होऊन कुकडी प्रकल्पातून २० आॅक्टोबरपासून नदीद्वारे आणि २५ आॅक्टोबर २०१८ पासून कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर कालवा समितीची १६ आॅक्टोबर २०१८ रोजी दुसरी बैठक होऊन जादा पाणी सोडण्याचा निर्णय झाला. यात ५५ दिवसांचे आवर्तन सोडण्याचे ठरले. मात्र प्रत्यक्ष ६२ दिवसांनंतर पाणी बंद करण्यात आल्याने इतक्या मोठ्या आवर्तनात तब्बल १०.६६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. ४.४६ टीएमसी पाणी जादा सोडण्यात आल्याने आता धरणात अवघे १०.५४ टीएमसी पाणी शिल्लक आहे.
सर्वाधिक पाणीसाठा डिंभे धरणात शिल्लक आहे. या धरणात ६.८९ टीएमसी पाणीसाठा आहे. मात्र उर्वरित दिवसांत ६० टक्केच पाणी उपयोगी पडणार असून ४० टक्के पाण्याची घट होणार असल्याने त्याचा फटका उन्हाळ्यात बसणार आहे. कुकडी पाटबंधारे विभागाच्या निष्क्रियतेमुळे प्रथमच जुन्नर तालुक्यासह आंबेगाव, शिरूर आणि पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, करमाळा या तालुक्यांना पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कुकडी प्रकल्पातून २० आॅक्टोबर २०१८ पासून सोडण्यात आलेल्या ९.३५२ टीएमसी पाण्यापैकी कुकडी डाव्या कालव्यातून सर्वाधिक ६.८०१ सोडण्यात आले. घोड शाखा कालव्यातून ०.१६८ टीएमसी, डिंभा उजवा कालव्यातून ०.९०९ टीएमसी, पिंपळगाव जोगा डावा कालव्यातून ०.९३७ टीएमसी, मीना पूरक कालव्यातून ०.००९ टीएमसी आणि मीना शाखा कालव्यातून ०.५२८ टीएमसी पाणी व नदीद्वारे कुकडी नदीला ०.५९१ टीएमसी, वडज धरणातून मीना नदीला ०.१८९ टीएमसी, डिंभे धरणातून घोड नदीला ०.५२८ टीएमसी असे एकूण १०.६६ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

उन्हाळयात जाणवणार तीव्र पाणीटंचाई
सध्या येडगाव धरणात ०.२४४ टीएमसी, वडज धरणात ०.५३२ टीएमसी, माणिकडोह धरणात १.४९१ टीएमसी, पिंपळगाव जोगा १.३८८ टीएमसी, डिंभा धरणात ६.८९१ टीएमसी असे एकूण १०.५४६ टीएमसी (३५.५३ टक्के) पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षी आजअखेर २६.६४३ टीएमसी (८७.२५ टक्के) पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५२.७२ टक्के पाणी कमी झाले असून इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याचा अजब निर्णय झाला आहे.

दोन आवर्तन इतके पाणी आणि ६२ दिवसांचे आवर्तन २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच झालेले आहे. पाटबंधारे अधिकाºयांचे नियोजन फसल्याने आणि नियोजनाचा अभाव यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. यामुळे पाटबंधारे अधिकारी यांची चौकशी करावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे. अधिकाºयांच्या निष्क्रियतेमुळे राजकीय वातावरण तप्त होणार असल्याने पाणीप्रश्न पेटणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
पाणी खाली जात असताना विरोधकांनी गप्प बसण्याची भूमिका ठेवून पाणी खाली गेल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू केल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
 

Web Title:  After the cucumber project stopped the cycle, 10.66 TMC water released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.