शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

सर्वपक्षीय आंदोलनानंतर कुकडी डाव्या कालव्याचे पाणी बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 8:28 AM

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या धरणांतील सर्व पाणी नगर आणि सोलापूरला गेल्यानंतर मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येत होते. अतिरिक्त पाणी गेल्यानंतर मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन आंदोलनानंतर काल (दि. २०) रात्री ८ वाजता कुकडी डावा कालव्याचे पाणी बंद केले

पुणे (नारायणगाव): कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या धरणांतील सर्व पाणी नगर आणि सोलापूरला गेल्यानंतर मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येत होते. अतिरिक्त पाणी गेल्यानंतर मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन आंदोलनानंतर काल (दि. २०) रात्री ८ वाजता कुकडी डावा कालव्याचे पाणी बंद केले. आता कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणात अवघे ०.८२ टक्के असा नीचांकी पाणीसाठा राहिला आहे. गेल्या वर्षी आजमितीला सर्व धरणांत उपयुक्त असा १३.८५ टक्के पाणीसाठा होता.

राष्ट्रवादी युवा नेते अतुल बेनके, पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आणि शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर धरणातून पाणी बंद करण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी तिसरे आवर्तन म्हणून येडगाव धरणामधून दि. ६ एप्रिल २०१९ रोजीपासून उन्हाळी आवर्तन सुरू होते. हे आवर्तन ४५ दिवस सुरू होते. राजकीय उदासीनता आणि पाणी सोडताना वारंवार होणारा बदल व कालवा सल्लागार समितीचे नियोजन फसल्याने कुकडी प्रकल्पातील वडज, पिंपळगाव जोगा आणि डिंभे ही धरणे रिकामी झाली आहेत. दर वर्षी पिंपळगाव जोगा धरणातूनच मृतसाठा काढण्यात येतो; मात्र या वर्षी प्रथमच  डिंभे आणि वडज या धरणांतून मृतसाठा काढण्यात आलेला आहे. कुकडी प्रकल्पातील पाच धरणांपैकी माणिकडोह धरणामध्ये अवघे १.४० टक्के, तर येडगाव धरणामध्ये पिंपळगाव जोगा धरणातून घेण्यात आलेल्या पाण्यामुळे अवघे ५.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत सरासरी पाणीसाठा अवघे ०.८२ टक्के आहे. गेल्यावर्षी २१ मे २०१८ अखेर उपयुक्त पाणीसाठा ४३३२ द.ल.घ.फू. (१३.८५ टक्के) होता. दुष्काळी परिस्थितीत कालवा सल्लागार समितीने धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याचे योग्य नियोजन केलेले नाही. नगर व सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश अधिकारी जलसंपदा विभागात असल्याने तसेच या दोन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व मंत्री यांनी दबाव तंत्र अवलंबून पाच धरणांतील पाणीसाठा गरज नसताना पळविला.

पहिले रब्बी आवर्तन ६ टीएमसीचे असते; मात्र सल्लागार समितीने १० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात १४.५ टीएमसी पाणी सोडण्यात आले. हे आवर्तन साधारण ६३ दिवस सुरू होते. वास्तविक, ६ टीएमसी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात १४.५ टीएमसी पाणी अर्थात अडीच आवर्तने इतके पाणी एकाच वेळी सोडल्याने ऐन दुष्काळात पाण्याचे नियोजन फसले. राजकीय दबावामुळे पहिल्याच आवर्तनात धरणातील ५० टक्के पाणी गेले. त्यानंतर कालवा समितीमध्ये २ मार्च २०१९ रोजी दुसरे आवर्तन म्हणून ६.५ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक, पहिले आवर्तन १४.५ टीएमसी सोडल्याने दुसरे आवर्तन न सोडता थेट उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. तरीदेखील दुसरे आवर्तन सोडण्यात आले. त्यानंतर दि. ६ एप्रिल २०१९ पासून उन्हाळी आवर्तन म्हणून तिसरे आवर्तन सोडण्यात आले. तब्बल ४५ दिवसांनंतर पाणी बंद करण्यात आले.

टॅग्स :Damधरणdroughtदुष्काळWaterपाणी