शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याच्या अभ्यासासाठी ‘आदित्य मिशन’

By admin | Updated: August 2, 2015 04:38 IST

‘चांद्रयान २’ ही मोहीम फत्ते झाल्यानंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य मिशन’ राबविण्यात येणार आहे. त्याला केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे आणि त्याचे कामही सुरू झाले आहे.

पुणे : ‘चांद्रयान २’ ही मोहीम फत्ते झाल्यानंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य मिशन’ राबविण्यात येणार आहे. त्याला केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे आणि त्याचे कामही सुरू झाले आहे. हे यान पृथ्वीपासून एका ठराविक अंतरावर जाऊन तेथे थांबून सातत्याने सूर्याचा अभ्यास करणार आहे, अशी माहिती ‘मंगळयान’ मोहिमेचे प्रमुख डॉ. सुब्बय्या अरुणन यांनी दिली.डॉ. अरुणन एका कार्यक्रमासाठी शनिवारी पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘आदित्य मिशन’मुळे सूर्याचा सखोल अभ्यास केला जाईल. त्यातून सूर्याबाबतच्या अनेक प्रश्नांचा उलगडा होईल, असे सांगत अरुणन म्हणाले, की ‘चांद्रयान १’ मोहिमेच्या यशानंतर २०१७ मध्ये भारताकडून ‘चांद्रयान २’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे. यानाला पृथ्वीवरून पाठविण्यासाठी आणि चंद्राच्या पृष्ठभागावर हळूवारपणे उतरण्यासाठी विशेष इंजिनची आवश्यकता असते. तसे अत्याधुनिक, पूर्णपणे भारतीय बनावटीचे इंजिन बनविण्याचे काम प्रगतिपथावर आहे आणि लवकरच ते पूर्ण होईल.मंगळयान मोहिमेच्या पुढील आव्हानाबाबत ते म्हणाले, की आता मंगळयान हे पृथ्वीपासून सर्वाधिक लांब आहे. सध्या ते पृथ्वीपासून ३०९० मिलियन किमी दूर आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये ते लांबीचा टप्पा गाठणार आहे. त्यानंतर या यानाचे अंतर पुन्हा कमी करणे हे आव्हान आमच्यासमोर आहे. त्याबरोबर पुढील काळात यान सूर्यापासून लांब जाणार आहे. त्यामुळे यानाला ऊर्जा मिळणे कठीण होईल आणि त्यावर काम करणे हे आव्हानात्मक आहे. (प्रतिनिधी)‘चांद्रयान २’ मोहीम आमच्यासाठी महत्त्वाची आहे. या मोहिमेअंतर्गत आम्ही चंद्रावर यान-बग्गी उतरविणार आहोत. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मोहिमेसाठी यानाला एक वैशिष्ट्यपूर्ण इंजिनची आवश्यकता आहे. जे पृथ्वीवरून वेगाने हवेत झेपावेल आणि चंद्राच्या वातावरणात पोहोचल्यानंतर हळुवारपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. या दोन्ही गोष्टी एकाच इंजिनमध्ये आणणे अवघड आहे. असे इंजिन बनविण्याचे काम इस्रोमध्ये सुरू असून, लवकरच ते पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.‘मंगळयाना’च्या पुढच्या टप्प्याबाबत डॉ. अरूणन म्हणाले, की मंगळयानाच्या आणि पृथ्वीच्या मधोमध सूर्य असल्याने गेले २ महिने यान अ‍ॅटोमेशन प्रोगामवर ठेवण्यात आले होते. दोन महिन्यानंतर यानाचे इंजिन पुन्हा सुरू करण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आणि यान पुन्हा सुरू झाले. या दोन महिन्यांत या यानाने मंगळ ग्रहाची टिपलेली छायाचित्रे आणि इतर माहिती घेण्याचे काम सुरू आहे.