शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्यांना दणका..! १०५ जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:27 IST

मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी लोकलमधून लटकत प्रवास करीत असताना खाली पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

पुणे :रेल्वेतून प्रवास करताना जागा न मिळाल्याने काही प्रवासी दरवाजात उभे राहून प्रवास करतात. अशा लटकत अथवा पायऱ्यांवर बसून प्रवास करणाऱ्यांवर पुणेरेल्वे विभागाकडून कारवाईची मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, १०५ जणांवर कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी लोकलमधून लटकत प्रवास करीत असताना खाली पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर पुणे विभागाने धोकादायक प्रवास रोखण्यासाठी ११ ते २५ जूनदरम्यान एक विशेष तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये दरवाजात उभे राहून अथवा लटकत प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत १०५ प्रवासी धोकादायक पद्धतीने प्रवास करताना आढळून आले.

तीन महिने कारवास :रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १५६ अंतर्गत रेल्वे गाडीच्या छतावर, इंजिनवर, पायऱ्यांवर किंवा दरवाजांवर प्रवास करणे सक्त मनाई आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी समज देऊनही जर एखादी व्यक्ती अशा प्रतिबंधित ठिकाणी प्रवास करीत राहिली, तर त्या व्यक्तींवर कारवाई करून त्यास ५०० रुपयांच्या दंडाची अथवा तीन महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात आहे.

पुणे रेल्वे विभाग प्रवाशांच्या सुरक्षेची कटिबद्धता आहे. पायऱ्यांवर प्रवास करणे ही अत्यंत धोकादायक सवय आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी भविष्यातही अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येतील. नागरिकांनी दरवाजात बसून अथवा लटकत प्रवास करू नये. सुरक्षित प्रवासाच्या नियमांचे पालन करावे. - हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी