शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

‘आरपीएफ’कडून बोगस तिकीट एजंटांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 1:04 PM

पुण्यात कोंढवा येथील ‘एमके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स’ या दुकानावर छापा टाकण्यात आला...

ठळक मुद्दे३८० ई-तिकिटे जप्त : मध्य रेल्वेने शहरात विविध ठिकाणी टाकला छापाप्रगती एक्स्प्रेस सोमवारपासून धावणार

पुणे : मध्य रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) बेकायदेशीरपणे ई-तिकीट विक्री करणाऱ्या एजंट व व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दि. ४ नोव्हेंबर रोजी एका दिवसात ११ लाख ६० हजार रुपये किमतीची ३८० ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आठ जणांकडील साहित्य जप्त करून त्यांना अटक करण्यात आली.मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात कोंढवा येथील ‘एमके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स’ या दुकानावर छापा टाकण्यात आला. त्यामध्ये १८ हजार ९२९ रुपये किमतीची ९ तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. तसेच सरफराज मन्सूर अली अहमद यांना अटक करण्यात आली. मार्केट यार्ड येथील यश गिफ्ट शॉपवर टाकलेल्या छाप्यात रमेश कुमार पुखराज जी जांगिड यांना ३८ हजार १९२ रुपये किमतीच्या २२ ई-तिकिटांसह अटक करण्यात आली. महादेवनगर येथील ईजी टूर्सवर टाकलेल्या छाप्यात हनुमंत शेंडगे यांना अटक करून त्यांच्याकडून  ८ हजार ९०५ रुपयांची ७ तिकीटे जप्त करण्यात आली. चिंचवडमधील संभाजीनगर येथील पाटील इंटरप्रायजेसवर छापा टाकून सोमनाथ पाटील यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३६ हजार ९८५ रुपये किमतीच्या १८ तिकिटांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे मिरज, मुंबई व नागपूर येथेही छापेमारी करून चौघांना अटक करण्यात आली. मुंबईत प्रदीप गंगवानी आणि इकबाल बासिक अली खान यांना घाटकोपर येथून अटक झाली. त्यांच्याकडून १० लाख ४ हजार ३० रुपये किमतीची तिकिटे जप्त करण्यात आली. दरम्यान, मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत दि. २६ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत ४६ जणांना ९६० ई-तिकिटांसह अटक करण्यात आली. या तिकिटांची किंमत २० लाख ५५ हजार ८५३ रुपये एवढी आहे. ............४‘आरपीएफ’च्या पुणे विभागात दि. २६ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत ई-तिकिटांची बेकायदेशीर विक्री करताना १६ जणांना पकडण्यात आले. ४त्यांच्याकडून ३५८ ई-तिकिटे जप्त करण्यात आली. तसेच १० लाख ५७ हजार ९७८ रुपयांचा दंड वसूल करून त्यांच्याविरोधात रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय सुरक्षा आयुक्त अरुण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. .........प्रगती एक्स्प्रेस सोमवारपासून धावणारपुणे : मंकी हिल ते कर्जतदरम्यान घाट क्षेत्रात सुरू असलेल्या देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे रद्द करण्यात आलेली प्रगती एक्स्प्रेस दि. ११ नोव्हेंबरपासून पुन्हा धावणार आहे. ही गाडी दि. ३० नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्याचप्रमाणे पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला दि. ६ ते १० नोव्हेंबरपर्यंत कर्जत स्थानकात   एका मिनिटाचा थांबा घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेticketतिकिटfraudधोकेबाजी