अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, खुन करुन पसार झालेल्या आरोपीस ३६ तासाच्या आत अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:44 IST2025-02-16T16:44:12+5:302025-02-16T16:44:21+5:30
कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन, कोणत्यातरी हत्याराने, त्याचे डोक्यात मारुन, त्यास गंभीर जखमी करुन त्याचा खून केला

अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, खुन करुन पसार झालेल्या आरोपीस ३६ तासाच्या आत अटक
- पांडुरंग मरगजे
धनकवडी : अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून त्याचा खुन करुन पश्चिम बंगाल येथे पसार झालेल्या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या ३६ तासाच्या आत पश्चिम बंगाल मधून ताब्यात घेतले असून बिरण सुबल करकर, ऊर्फ बिरण सुबल कर्माकर, (वय ३० वर्षे, रा, पश्चिम बंगाल) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी चे नाव आहे. तर नयन गोरख प्रसाद, (वय ४५ वर्षे, रा, जि. सिवान, ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
आंबेगाव पठार येथील चिंतामणी चौकात बांधकाम चालू असलेल्या साईटच्या पहील्या मजल्यावर अज्ञात इसमाचा, कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन, कोणत्यातरी हत्याराने, त्याचे डोक्यात मारुन, त्यास गंभीर जखमी करुन त्याचा खून केला होता.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तात्काळ तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना मयत इसमाची ओळख पटवुन आरोपीचा शोध घेणे बाबतच्या सुचना दिल्या.
वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन चे तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी व तपास पथकाचे पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळावर मिळून आलेल्या रक्ताने माखलेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केला असता त्यावरुन मयत इसमाचे नाव आणि पत्ता निष्पन्न झाले, त्या नंबर मयतच्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केला असता त्यामध्ये मयत इसमाचे सोबत बिरण सुबल करकर, ऊर्फे बिरण सुबल कर्माकर, हा इसम असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली,
दरम्यान बिरण सुबल करकर, ऊर्फ बिरण सुबल कर्माकर याचा शोध घेत असताना तो पश्चिम बंगाल येथे गेल्याची माहीती मिळताच वरीष्ठांचे मार्गदर्शनखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलस अंमलदार मंगेश पवार, अभिनय चौधरी यांनी पश्चिम बंगाल येथे जावुन नमुद आरोपीचा शोध घेतला असता तो हावडा रेल्वे स्टेशन भागातून अटक करण्यात आली आहे.
दारु पिल्यानंतर मती फिरली, एकाने दुसर्या च्या पत्नीवर कॉमेंट केले, त्यामुळे झालेल्या वादात खोलीतील लोखंडी पहारीने वार करुन खुन करुन आरोपी पळून गेला. दोन दिवसानंतर वास येऊ लागल्यावर खून झाल्याचे उघडकीस आले. परंतु, खुनाची घटना घडल्यानंतर दोन दिवसांनतर मृतदेह सडू लागल्याने त्याची ओळख पटू शकत नव्हती. खुन झालेला कोण आणि आरोपी कोण याचा काही पत्ता लागत नव्हता. अशावेळी पोलिसांच्या मदतीला धावून आला रक्ताने माखलेला एक मोबाईल. रक्ताने माखलेला मोबाईलच बोलला आणि मृताची ओळख पटली अन आरोपीचे नाव समजले. भारती विद्यापीठ पोलिसांनी पश्चिम बंगालमधील हावडा येथे जाऊन आरोपीला पकडून आणले.